👁 6 Views

पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज चे “विशेष श्रमसंस्कार शिबिराचे” आयोजन

○ १६ ते २२ जानेवारी दरम्यान होणार शिबिर: प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांची माहिती

पंढरपूर: प्रतिनिधी 

एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांचे संयुक्त विद्यमानाने कोर्टी  (ता.पंढरपूर) येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सोमवार दिनांक १६ ते २२ जानेवारी २०२३ या कालावधीत “विशेष श्रमसंस्कार शिबिर” आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर कोर्टी (ता.पंढरपूर) येथे विविध उपक्रम राबवून संपन्न होणार असल्याची माहिती प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.


   या शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे, पांडुरंग शुगरचे संचालक भैरू (मामा) वाघमारे, विठ्ठल शुगर संचालक बाळासाहेब हाके, उपजिल्हाधिकारी समाधान घुटुकडे, डाॅ. संजय मुजमुले सरपंच विवेक पवार, उपसरपंच महेश येडगे, ग्रामपंचायत सदस्य पोपट हाके, राजाभाऊ शेंबडे, अझरुद्दीन शेख, मुन्ना शेख, सिकंदर मुलाणी, अनिस पाटील, माजी सदस्य शरीफ शेख, नानासो हाके, राजाराम माळी, विद्यार्थी प्रतिनिधी नागेंद्रकुमार नायकुडे आदी हस्ते संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.


   या शिबिरात प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे, डाॅ. संजय मुजमुले, समाधान घुटुकडे व प्रा. चंद्रकांत देशमुख यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले.

    महाविद्यालयाच्या वतीने आयोजित केल्या या शिबिरात तज्ञ व अनुभवी वक्त्यांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहे. दैनंदिन श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे. याशिवाय जैविक तंत्रज्ञान याविषयावर विशेष मार्गदर्शन करण्यात येणार आहे.


    हे शिबिर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा. चंद्रकांत देशमुख, प्रा. अर्जुन मासाळ, प्रा. अजित करांडे, प्रा. सिद्धेश्वर गंगोंडा, प्रा. सुमित इंगोले सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी तसेच ग्रामपंचायत कोर्टी सह ग्रामस्थ परीश्रम घेणार आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *