👁 6 Views

स्टार्टअप याञेत पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थ्यांना पारितोषिक

पंढरपूर: प्रतिनिधी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्याकडून घेण्यात आलेल्या सोलापूर स्टार्टअप यात्रा या स्पर्धेमध्ये पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग मधील  विद्यार्थ्यांनी प्रथम, द्वितीय क्रमांक प्राप्त करून यश संपादन केले असल्याची माहिती प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.


   पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेले बालाजी गजानन पवार, प्रशांत सर्जेराव पवार आणि संकेत केशव नागणे या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकाचं बक्षीस पटकावलं आहे, या विद्यार्थ्यांनी सोलार पॅनल ची स्वच्छता करणारा रोबोट बनविला होता. 


  सोमवार दिनांक १६ जानेवारी २०२३ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक, सन्मानचिन्ह व रोख रक्कम दहा हजार रुपयांचा धनादेश दिला तर  द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक सिंहगड महाविद्यालयातील यशराज गवळी, दिशा होनमाने आणि धनाजी भालेराव या विद्यार्थ्यांना मिळाल असून प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम साडेसात हजार रुपयांचा धनादेश देऊन त्यांचा गौरव करण्यात आले.


या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व निवासी उपजिल्हाधिकारी शमा ढोक- पवार उपस्थित होत्या. या कार्यक्रमात डाॅ. मृणालिनी फडणवीस व शिरीष देशपांडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डाॅ. स्वानंद कुलकर्णी, प्रा. अतुल आराध्ये सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *