👁 6 Views

सोलापूर; गड्डा यात्रेत दिवसाढवळ्या बिहारी तरूणाचा खून

 

सोलापूर; मोठ्या गर्दीने गड्डा यात्रा भरलेली असतानाच गुरुवारी सायंकाळी मार्केट पोलीस चौकीसमोर असलेल्या विष्णू घाटाजवळ एका तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.


घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपींना पकडले आहे.

अतिफ अख्तर शाह (मूळ – बिहार) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी तात्काळ आरोपींचा शोध घेऊन आरोपी तेहरार खान (मूळ – मध्य प्रदेश) याला अटक केली आहे. 8 हजार रुपयांच्या वादातून ही हत्या झाली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. श्री सिद्धरामेश्वर यांची गड्डा यात्रा परंपरेप्रमाणे होम मैदानावर भरली आहे. 


या यात्रेत सोलापूर शहर जिल्ह्यासह परिसरातील जिल्ह्यातूनही भाविक मोठ्या प्रमाणावर येतात. विविध खाद्यपदार्थ, साहित्य, वस्तू, खेळणी आदींची दुकाने मोठ्या प्रमाणावर गड्डयावर लावण्यात आलेली आहेत. गर्दीने गड्डा फुललेला असतानाच शुक्रवारी वादातून एका कामगाराने दुसर्‍या कामगाराची हत्या केल्याचे यात्रेकरूंमध्ये खळबळ उडाली.

खून केल्यानंतर आरोपीने तेथून पळ काढला. पोलीसांनी तात्काळ आरोपींचा शोध घेण्यासाठी रेल्वे स्टेशन, बसस्थानक गाठले. आरोपी तेहरार खान हा खाजगी ट्रॅव्हल्सने पुण्याकडे पळून जात असतानाच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्यल्या. 


आपसातील वादातून एका कामगाराने दुसर्‍या कामगाराचा खून केल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. याप्रकरणी 6 ते 7 आरोपी असण्याची शक्यता असून पोलीस इतर आरोपींचाही शोध घेत आहेत. लवकरच सर्व आरोपींना अटक करण्यात येईल, असे सदर बझार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर यांनी सांगितले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *