👁 3 Views

संतापजनक: जन्मदात्या आईने क्षुल्लक कारणावरुन दोन चिमुकल्यांना विहिरीत फेकलं

 

नांदेड : जन्मदात्या आईने दोन चिमुकल्यांना विहिरीत फेकल्याची धक्कादायक घटना नांदेडमध्ये समोर आली आहे.


घटने दोन्ही लहानग्यांचा दु्र्दैवी मृत्यू झाला आहे. पतीसोबत झालेल्या भांडणानंतर महिलेने हे क्रूर पाऊल उचललं आहे. पती हैदराबाद येथे सोबत नेत नाही म्हणून महिलेने रागाच्या भरात हे पाऊल उचललं.


ह्रदय पिळवटून टाकणारी ही घटना नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील गुत्ती तांडा येथे काल घडली आहे. पुजा आडे असं क्रूर आईचं नाव आहे. संतोष आडे हा हैदराबाद येथे खाजगी कंपनीत काम करतो. पतीने आपल्याला हैदराबादला घेऊन जावं अशी पूजाची इच्छा होती. 

यासाठी पूजाने संतोष जवळ तगादा लावला होता. यातून दोघांमध्ये कडाक्याचे भांडणे झाले. याच भांडणानंतर रागाच्या भरात पूजाने तीन वर्षाचा मुलगा सिद्धार्थ आणि चार महिन्याच्या फुंदी या मुलीला जवळच असलेल्या विहीरीत फेकले.


गावातील लोकांना हा प्रकार दिसल्याने त्यांनी तातडीने दोघांनाही विहिरीतून बाहेर काढले. मात्र दोघांचाही यात मृत्यू झाला. याप्रकरणी क्रुर माता पूजावर मरखेल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *