👁 11 Views

स्वेरी मध्ये ‘मेसा’ तर्फे तंत्रज्ञान मॉडेल्सचे प्रदर्शन..! जिद्धीला परीश्रमाची जोड दिल्यास यश दूर नाही !- डॉ. बी.पी.रोंगे

  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 18  september  2017 

पंढरपूर येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूर संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयामधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाच्या विद्यार्थ्यानी मॉडेल प्रदर्शन आयोजित केले. या प्रदर्शनाचे उदघाटन संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात अवजड वाहनांचे विविध पार्टस व सैन्यदलातील रणगाडेक्षेपणास्त्रे,लढाऊ विमान यांच्या मॉडेलचे प्रदर्शन भरविले. संपूर्ण दिवसभर विद्यार्थ्यानी केलेल्या या तंत्र मॉडेल्स पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती.   
                  या कार्यक्रमास पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भेट दिली. या भेटीतून त्यांना अत्यावशक माहितीत भर पडली व अभियांत्रिकी विषयी आणखी जिज्ञासा निर्माण झाली. त्यांना विविध शाखेबद्दल पायाभूत माहिती दिल्यामुळे अभियांत्रिकी क्षेत्रात अजूनही करिअर करण्याच्या संधी असल्याचे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. रोंगे म्हणाले, ‘भविष्य काळात याच माहीती व तंत्रज्ञानाच्या आधारे स्पर्धा परीक्षा देवून अधिकारी होतील आणि भारतातील शिक्षण क्षेत्रात आपला स्वतंत्र ठसा निर्माण केला. असून विद्यार्थ्यांनी घेत असलेल्या परिश्रमाला निश्चितपणे यश मिळते याचे कारण म्हणजे. कोणत्याही गोष्टीत मन लावून अभ्यास केल्यास आणि त्याला जिद्धीची जोड दिल्यास सामान्य विद्यार्थी देखील मागे रहात नाही. 
‘याप्रदर्शनामध्ये संरक्षण विभागातील विविध रणगाडे व त्यांचे नमुने तसेच समुद्राच्या लाटांमधून वीज निर्मिती करणारे मशीनचे मॉडेल, माजी राष्ट्रपती व दिवंगत शास्त्रज्ञ डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या सात प्रकारचे मिसाईल क्षेपणास्त्र यांचे नमुने व त्यांचा वापर कुठे कुठे करण्यात आला याची सविस्तर माहिती देणारी पोस्टर्स यांचे प्रदर्शन भरविले होते. नाव नवीन तंत्रज्ञानाची माहिती, मोठमोठे जहाज, लढवू विमान, भविष्यात वापरात येणारे व संशोधन होत असलेल्या विकसित वाहने व उडणारी वाहने याविषयी माहिती, अपघात तळणासाठी वाहनात असणाऱ्या सोयी व सुविधा यांचे मॉडेल्स तयार करून संपूर्ण विभाग मेकॅनिकलमय बनविण्यात आले होते. विविध ठिकाणी रांगोळी, फुगे, विविध रंगांच्या पताका लावण्यात आले होते. यातूनही मेकॅनिकलचे दर्शन होत होते. यावेळी मेसा प्रेसिडेंट आशिष शहाणेव इतर सहकारी तन्मय यादव, तोहित शेख, निखील देशमाने, अक्षय कोरे, विवेक भोसले, अनिकेत शिंदे, प्रज्योत घोंगडे, नितीन कदमजगदीश पिसे, प्रथमेश म्हमाणे, विशाल कोळेकर, आशुतोष पोतदार, रवींद्र गुंजाळ, अक्षय खांडेकर, किरण गायकवाड, पंकज पाटील, सागर कोळी, अनिल मंटगे, गुरुप्रसाद बडवे, ऋषिकेश शिंदे, शुभम शहाणे, सागर बागेवाडी, अभिषेक यादव, चैतन्य अभंगराव, चैतन्य सोनावणे, राजदीप कोठावळे, पल्लवी पाटील, कुलसुम काझी, मयुरी राऊत, प्रियदर्शनी गायकवाड, कोमल गुंड, पूजा लामगुंडे, श्रुती पाटील, अरुणा पुजारी, भैरवी फंड, सुप्रिया कोळेकर, प्राजक्ता पाणगावकर, आकाश रक्ते, ऋषभ जाधव, अमर भानवसे, सुप्रिया कोळेकर, ज्योती देशमुख, अनिकेत चव्हाण, सौरभ भोसले,स्नेहल काळे यांच्यासह आदी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.यावेळी स्वेरीचे सर्व विद्यार्थ्यांसह मेकॅनिकल शाखेचे प्रमुख डॉ. पी.एस. कचरेअधिष्ठाता डॉ. पी.एम. पवारअधिष्ठाता डॉ.अभय उत्पात, विद्यार्थी अधिष्ठाता प्रा.सचिन गवळी  व मेसा समन्वयक प्रा. अविनाश पारखे यांच्यासह उपस्थित होते.
छायाचित्र- १.श्री विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयामधील मेकॅनिकलइंजिनिअरिंग विभागाच्या विद्यार्थ्यानी विविध मॉडेल्सचे प्रदर्शन आयोजित केलेहोते याचे उदघाटन करताना संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगेसोबत डावीकडून मेसा समन्वयक प्रा. अविनाश पारखेप्रेसिडेंट आशिष शहाणेव विद्यार्थी. २. बनविलेले मॉडेल्स   
 From-
Shri. Santosh  C. Halkude
Pandharpur – 413 304. 
Mob: 9545 55 36 28, 

          9850 24 21 55 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *