- 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 20 september 2017
पंढरपूर/प्रतिनिधी
दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्पात समाजाकडून नवरात्र महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून गुरुवार दि. 21 सप्टेंबर 2017 ते गुरुवार दि. 5 ऑक्टोबर 2017 अखेर विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असल्याची माहिती समाजाचे अध्यक्ष भागवताचार्य वा.ना. उत्पात यांनी पत्रकाद्वारे दिली.
दि. 21 सप्टेंबर ते 29 सप्टेंबरपर्यंत रोज सायं. 4 ते 5.30 या कालावधीत ह.भ.प. वा.ना. उत्पात हे रुक्मिणी स्वयंवर कथा सांगतील. त्याचप्रमाणे सायं. 5 ते 6 या दरम्यान सामुदायिक रुक्मिणी स्वयंवर ग्रंथ पारायण होईल. नवरात्र महोत्सवादरम्यान उत्पात समाजातर्फे शहर आणि परिसरातील विविध भजनी मंडळाचे कार्यक्रम आयोजित केले असून 21 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 10 सायं. 4 या वेळेत शहरातील विविध भजनी मंडळे कार्यक्रम करतील. रोज सायं. 8 ते 10 या वेळेत समस्त उत्पात समाजाकडून भजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. दि. 2 ऑक्टोबर 2017 रोजी रात्री 8 ते 10 या वेळी हेमंत उत्पात यांचे खिरापतीचे भजन होईल. त्यानंतर मंगळवार दि. 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते 12 यावेळेत ह.भ.प. हेमंत उत्पात यांचे काल्याचे कीर्तन होऊन नवरात्र महोत्सवाची सांगता होईल.
हे सर्व कार्यक्रम वसिष्ठ आश्रम, काळा मारुती जवळ येथे होणार असून या सर्व कार्यक्रमांना भाविकांनी आणि शहरवासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन उत्पात समाजातर्फे करण्यात आले आहे.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे