👁 10 Views

सोलापूर -हॉटेल त्रिपुरसुंदरीच्या बारा खोल्या सील

  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 21 september  2017 


बँक ऑफ इंडियाकडून घेतलेल्या कर्जाची मुदतीत परतफेड केली नसल्याने जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार होटगी रस्त्यावरील हॉटेल त्रिपुरसुंदरी सील करण्याची कारवाई मंगळवारी रात्री करण्यात आली. पहिल्या टप्प्यात चौथ्या मजल्यावरील १२ खोल्या सील केल्या असून उर्वरित दोन दिवसांमध्ये संपूर्ण हॉटेलच सील करण्यात येणार आहे. हॉटेल सील करून बँक ऑफ इंडियाकडे ताबा देण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार विनोद रणवरे यांनी सांगितले.
सम्राटचौकातील बँक आॅफ इंडिया शाखेकडून कटारे स्पिनिंग मिलने सन २०१५ साली हॉटेल त्रिपुरसुंदरीची जागा तारण ठेऊन १५ कोटी रुपयांचे कर्ज काढले होते. कटारे यांच्याकडे १६ कोटी रूपयांचे कर्ज थकल्याने बँकेने जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करून वित्तीय मालमत्तेचे संपादन पुर्नरचना आणि तारण हक्काची अंमलबजावणी कायद्यानुसार मालमत्ता सील करून ताब्यात देण्याची मागणी केली. त्यानुसार मंगळवारी जिल्हाधिकारी भोसले यांनी हॉटेल त्रिपुरसंुदरी सील करून ताब्यात देण्याचे आदेश उत्तर तहसीलदार विनोद रणवरे यांना दिले.
तामलवाडी(ता.तुळजापूर) येथील कटारे स्पिनिंग मिलच्या आवारात सोलर जनरेशनसाठी सन २०१५ साली कर्ज घेतले होते. सन २०१६ पर्यंत नियमित कर्जाची परतफेड केली आहे. मुळात हॉटेलची मालमत्ता ही अॅडिशनल सिक्युरिटी म्हणून तारण दिली असल्याने बँक अधिकाऱ्यांना कारवाई करता येत नाही. त्यांनी चुकीच्या पद्धतीने कारवाई केली आहे. बँक अधिकारीविरोधात सदर बझार पोलिसांत तक्रार दिलीे. 
– किशोर कटारे, प्रमुख, हॉटेल त्रिपुरसुंदरी

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *