👁 9 Views

चिटमोगरा येथे उद्या नामवंत प्रसिद्ध भिम शाहीरांना वामनदादा कर्डक समाज प्रबोधन पुरस्कार वितरण समारंभ :

  • 12 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 25 september  2017 

बिलोली – वैभव घाटे
   येथून जवळच असल्येल्या मोजे चिटमोगरा ता. बिलोली येथील सामाजिक कार्यकर्ते तथा दैनिक सम्राटचे बिलोली तालुका प्रतिनिधी भास्कर भेदेकर यांनी उद्या दिंनाक 27 संप्टेबर रोजी सायंकाळी ठिक 7:00 वाजता   आपल्या मुलाच्या प्रथम वाढदिवसा निमित्त महाकारूणिक तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, राजश्री शाहु महाराज, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपल्या गीत गायनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणार्या गायकांचा महाकवी वामनदादा कर्डक सन्मान चिन्ह व पुरस्कार मान्यवरांचे शुभहस्ते देवुन गौरव करण्यात येणार आहे.
       चिटमोगरा ता. बिलोली जि.नांदेड येथील बहुजन महाआघाडीचे बिलोली तालुका सचिव भास्कर भेदेकर चिटमोगरेकर यांचा मुलगा शिल्पकार यांचा प्रथम वाढदिवस व लोककवि माहगायक वामनदादा कर्डक यांच्या जयंतिचे औचित्य साधुन फुले, शाहु, आंबेडकरी विचार धारा समाजात रूजविण्याचा प्रयत्न करनार्या गायकांचा वामनदादा कर्डक पुरस्कारने सन्मानित   करण्यात येत आहे.यामध्ये भिमशाहीर  अॅड. संजय भारदे,माधव वाडवे, रविराज भद्रे,गौतम भालेराव पोकर्णीकर,डॉ.शिवाजी कागडे, गंगाधर सोंडारे,गंगाधर सुंकनिकर,देविदास शेरे,संदिप भुरे,साहेबराव वाघमारे  नरंगलकर,नागनाथ बोदलेवाड,माधव बैलकवाड, हिराकांत केरूरकर,दिपक कांबळे आदी गायकांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
    या पुरस्कार वितरण कार्यक्रमास  प्रमुख  पाहुणे म्हणून   बहुजन महाआघाडीचे संस्थापक नेते सुरेशदादा गायकवाड, भिम टाईगर सेनेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब शेळके, राहुल प्रधान युवा पॅन्थर प्रमुख, डॉ. सिध्दोधन कांबळे,बहुजन टाईगर सेनेचे संस्थापक माधव जमदाडे,रामजिबाबा कंट्रक्शनचे अध्यक्ष  तथा सामाजिक कार्यकर्ते माधवदादा वाघमारे, देगलूर तहसिलचे तहसिलदार किरवले साहेब    व दै.सम्राट चे नांदेड जिल्हा प्रतिनिधी संभाजी कांबळे यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
      सायंकाळी भिम स्वरांजली हा बुध्द भिमगितांचा विविध नामवंत कलावंताचा गित गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.  तरी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित  रहावे असे आव्हान आयोजक ऊत्तम भेदेकर,त्र्यंबक भेदेकर,मधुकर भेदेकर, भास्कर भेदेकर,गौतम भेदेकर यांनी केले आहे.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *