👁 9 Views

‘संघर्ष’ या लघुपटाचा प्रिमियर शो पंढरपूरमध्ये संपन्न… संघर्ष केल्यावर यश हमखास मिळते असा संदेश या लघुपटाद्वारे दिग्दर्शक वायदंडे यांनी दिलाय..!-भगवान वानखेडे

  • 12 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 27 september  2017 



 यावेळी पंढरपूर लाईव्हचे संपादक भगवान वानखेडे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. तसेच दिग्दर्शक वायदंडे व कलाकारांचाही सत्कार करण्यात आला.


पंढरपूर (प्रतिनिधी):- 
आयुष्यात संघर्ष केल्यावर यश हमखास मिळते असा संदेश या लघुपटाद्वारे दिग्दर्शक वायदंडे यांनी दिला असल्याचे मत पंढरपूर लाईव्हचे संपादक भगवान वानखेडे यांनी मांडले. संघर्ष या लघुपटाच्या प्रिमियर शोप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, “संघर्ष” या शब्दाचा आणि माझ्या आयुष्याचा खुप जवळचा संबंध आहे. संघर्षमय जीवन मिळाल्यानेच मला सर्वसामान्य माणसांचं खडतर जीणं जवळून अनुभवायला मिळाल… समाजातील प्रतिभावंतांचं व सर्वसामान्यांचं अनमोल प्रेम मिळत आलं…”रडत रडत जगताना लढायला शिकलो.. आपण लढता लढता इतर रडणारांना लढायला शिकवायला हवं… या भावनेतून कार्य करत राहिलो.. सर्वसाधारणपणे जीवन जगताना पत्रकारितेच्या माध्यमातून वंचीत, शोषीत, अन्यायग्रस्तांसाठी असाधारण समाजकार्य करता येतं याची जाणीव आली.. आणि झपाटून कामाला लागलो..!” असाच संघर्ष करत या लघुपटाचे दिग्दर्शक समाधान वायदंडे यांनी करुन संघर्ष या लघुपटाची निर्मिती केली. या लघुपटाद्वारे त्यांनी संघर्ष केल्यावर यश हमखास मिळते असा संदेश दिला असल्याचे मनोगत पंढरपूर लाईव्ह चे संपादक भगवान वानखेडे यांनी मांडले.
निर्माते दिग्दर्शक समाधान वायदंडे यांच्या ‘संघर्ष’ या लघुपटाचा प्रिमियर शो नुकताच पंढरीतील विठ्ठल इन हॉटेलच्या सभागृहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे सिनेअभिनेते मुरली शेटे, संतोष शिरगीरे, रवि शेवडे, हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जोशाबा टाईम्स चे संपादक श्रीकांत कसबे हे होते. यावेळी सचिन कांबळे,  अ‍ॅड. नितीन बाबर, आबासाहेब आगावणे, नगरसेवक सुजीत सर्वगोड, माजी नगरसेवक अंबादास वायदंडे, महेश साठे, अतुलभैया चव्हाण, उमेश सर्वगोड, डी.राज सर्वगोड, किशोर खिलारे, शिवााजी सरनाईक, प्रमोद शेटे, पोलिस निरीक्षक संतोष इंगळे, उत्तम चव्हाण, शांतीलाल पटेल, समाधान कांबळे, सुरज पावले, मुन्ना सालविठ्ठल, विजय मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रमुख उपस्थित होते.
ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या व अतिशय गरीब कुटूंबात, प्रतिकुल परिस्थितीशी झगडत, अथक प्रयत्न व परिश्रम घेऊन अपेक्षीत यश संपादन करणार्‍या एका ‘जिगरबाज’ मुलाची कथा असलेल्या ‘संघर्ष या लघुपटाची निर्मिती अजनसोंड, ता.पंढरपूर या ग्रामीण भागातील निर्माते, दिग्दर्शक समाधान वायदंडे यांनी केली आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला नटराजाच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रिमियर शोच्या वेळी बोलताना मुरली शेटे म्हणाले की, ‘‘मुंबई पुण्याकडे चित्रपटाची निर्मिती होत होती. ती आता ग्रामीण भागापर्यंत आली असून मोठ्या प्रमाणात लघुपटाची निर्मिती होत असून वास्तववादी संदेश याद्वारे देता येतो. त्यामुळे अशा लघुपटाची निर्मिती होणं गरजेचे आहे. संतोष शिरगीरे, रवि शेवडे, सुजीत सर्वगोड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात श्रीकांत कसबे यांनी या चित्रपटासाठी निर्माते व कलाकारांनी घेतलेल्या कष्टाचे कौतुक केले. अशा उपक्रमाच्या मागे संवेदनशील लोकांनी उभे राहणे गरजेचे आहे. असेही ते म्हणाले.
 या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृष्णा वाघमारे यांनी केले. तर प्रास्ताविज्ञक व स्वागत समाधान वायदंडे यांनी केले.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *