👁 6 Views

भीमा नदी पूल ते अर्बन बॅक रस्त्याचे दुरुस्तीचे काम सुरु, वाहतूक वळवली

  • 12 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
  
पंढरपूर Live 12 October 2017
सोलापूर दि. 11 :- पंढरपूर शहरात भीमा नदी पूल ते मटण मार्केट ते अर्बन बॅक या प्रमुख रस्त्याच्या

दुरुस्तीचे काम सुरु आहे. या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होवु नये म्हणून पोलीस अधिक्षक एस. विरेश प्रभू यांनी
सर्व प्रकारच्या वाहनांना या मार्गावरुन येण्या-जाण्यास मनाई आदेश जारी केला आहे. हा आदेश 1 ते 30 ऑक्टोबर 2017 या कालावधीसाठी लागू राहणार आहे या मार्गावरुन वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी खालील प्रमाणे पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.

सोलापूर, मोहोळ, शेटफळ चौक, टेंभुर्णी, कामती, कडुन तीन रस्ता मार्गे पंढरपूर शहरात येवून मटण मार्केट
अर्बन बॅक मार्गे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या एसटी बसेस, खाजगी बसेस, ट्रक, डंपर, ट्रॅक्टर जिप, पिकअप, रिक्षा, व
इतर सर्व प्रकारची वाहने तीन रस्ता येथुन प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग:- तीन रस्ता- शेटफळ चौक – नवीन सोलापूर नाका-सरगम चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
पंढरपूर शहरातून अर्बन बॅक- मटन मार्केट अंबाबाई पटांगण मार्गे नवीन पूलावरुन तीन रस्ता मार्गे जाणारे सर्व
प्रकारची वाहने एसटी बसेस, खाजगी बसेस, ट्रक, डंपर, ट्रॅक्टर जिप, पिकअप, रिक्षा, व इतर सर्व प्रकारची वाहने
यांना सहकार चौक -इंदिरा गांधी चौक येथून प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग-सहकार चौक – सरगम चौक – नविन सोलापूर नाका- अहिल्यादेवी चौक मार्गे इच्छित स्थळी
जातील .पंढरपूर शहरातील अंतर्गत वाहनासाठी अर्बन बॅक – अनिल नगर- उपजिल्हा रुग्णालय-अंबाबाई पटांगण
या मार्गावर कोणतेही वाहन पार्क होणार नाही याबाबत सदरचा रोड नो पार्कीग करण्यात आला आहे. तसेच
अंबाबई पटांगण ते भजनदास चौक या रस्त्यावरुन ही अंतर्गत वाहतुक होणार असल्याने सदरचा रस्ता नो पार्कीग
करण्यात येत आहे.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *