पंढरपूर Live च्या सर्व दर्शकांना, जाहिरातदारांना व आमच्या हितचिंतक मित्रपरिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..! ही दिपावली तुम्हा सर्वांना सुख-शांती-समृध्दी व आरोग्यदायी व भरभराटीची जावो हीच श्रीविठ्ठल-रुक्मिणी चरणी प्रार्थना..!
- 13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीची आढावा बैठकीत अध्यक्ष डाॅ. अतुल भोसले यांनी घेतले महत्वपूर्ण निर्णय!
पंढरपूर येथील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीची आढावा बैठक डॉ. अतुल भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. चर्चेनंतर अध्यक्ष डाॅ. अतुल भोसले यांनी खालील महत्वपूर्ण निर्णय घेतले.
1. भाविकांसाठी वॉटर एटीएम उभारणार
पंढरपूर शहरात येणार्या भाविकांना शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या द़ृष्टीने मंदिर समितीमार्फत पाच ठिकाणी वॉटर एटीएम उभारण्यात येणार आहेत.
2. दर्शन मंडपात भविकांसाठी हॉटस्पॉट कनेक्शन
श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडपात बीएसएनएलकडून हॉटस्पॉट एंटेना बसविण्यात येणार असून, त्यामुळे भाविकांना हॉटस्पॉट कनेक्शन उपलब्ध होणार आहे.
3. दर्शन मंडपालगत हिरकणी कक्षाची स्थापना
दर्शनासाठी येणार्या स्तनदा मातांसाठी श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडपालगत दोन ठिकाणी हिरकणी कक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
4. पंढरपूर शहरात पाच ठिकाणी सुलभ शौचालयांची उभारणी
पंढरपूर शहरात गर्दीच्या पाच ठिकाणी मंदिर समितीमार्फत बी.ओ.टी. (बांधा, वापरा व हस्तांतरीत करा) तत्वावर सुलभ शौचालय(मुतारीसह) बांधण्यात येणार आहे.
5. कार्तिकी यात्रा नियोजन
बैठकीत कार्तिकी यात्रा नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यंदा कार्तिकी यात्रा दि.25/10/2017 ते 04/11/2017 या काळात भरत आहे. त्यामध्ये दर्शन रांगेसाठी बॅरीकेटींग करणे व लोखंडी उड्डाणपुल उभारणे, तात्पुरते पत्राशेड उभे करणे, खाजगी सुरक्षा व्यवस्थेसाठी कमांडो बंदोबस्तासाठी नियुक्त करणे, दर्शन मंडपापासून ते पत्राशेड पर्यंत जादा सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, दर्शन रांगेमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी मिनरल वॉटरची व्यवस्था करणे, दर्शन मंडपामध्ये दशमी, एकादशी व द्वादशीला मोफत चहाची व्यवस्था करणे, पुरेशा प्रमाणात बुंदी व राजगिरा लाडू प्रसादाची व्यवस्था करणे, देणगी जमा करून घेण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत करून घेणे, स्वच्छता व्यवस्थेचे चांगले नियोजन करणे. या सर्व बाबी नियमाप्रमाणे व पुरेशा प्रमाणात करण्यात येत आहेत.
तसेच दि. 21/10/2017 ते दि.04/11/2017या कालावधीत ऑनलाईन दर्शन सुविधा बंद ठेवण्यात येत आहे. तसेच दि.25/10/2017 ते दि.04/11/2017 या कालावधीत व्ही.आय.पी.दर्शन पासची सुविधा बंद ठेवण्यात येत आहे.दि.21/10/2017 ते 04/11/2017 या कालावधीत 24 तास दर्शन सुरू ठेवणे आणि नित्योपचार ठरवून दिलेल्या वेळेत करण्यात येत आहेत.
6. व्यवस्थापक विलास महाजन कार्यमुक्त
या बैठकीत मंदिर समितीचे व्यवस्थापक विलास महाजन यांना कार्यमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.
7. नोटामोजणी यंत्र प्रदान
समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांचे मुंबईचे मित्र डॉ. नोझेर शेरियार यांनी मंदिराला नोटामोजणी यंत्र भेट म्हणून दिले आहे. हे नोटामोजणी यंत्र समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आले.
बैठकीला अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, मंदिरे समितीचे सदस्य नगराध्यक्षा सौ. साधना भोसले,गहिनीनाथ महाराज औसेकर, भास्करगिरी महाराज, संभाजी शिंदे, सौ. शकुंतला नडगिरी,सचिन आधटराव, प्रांताधिकारी विजय देशमुख उपस्थित होते.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे