- 13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
युटोपियन शुगर्स आयोजित रक्दान शिबिराचे उद्घाटन करताना पांडुरंग परिवाराचे कुटुंब प्रमुख श्री सुधाकरपंत परिचारक यांच्या समवेत कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील साहेब, डॉ प्रतिश परिचारक, सुरेश आगावणे, शरद शिर्के यांच्यासह उपस्थित मान्यवर दिसत आहेत.
युटोपियन शुगर्स रक्तदान शिबीरात 111 जणांनी केले रक्तदान
युटोपियन शुगर्सची सामाजिक बांधिलकीशी नाळ जोडली असून समाजातील उपेक्षित घटकांच्या मदतीसाठी सातत्याने अग्रेसर असणार्या युटोपियनचे सामाजिक कार्य हे आदर्शवत असल्याचे प्रतिपादन पांडुरंग परिवाराचे कुटुंब प्रमुख व पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन सुधाकरपंत परिचारक यांनी केले .
युटोपियनचे कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त युटोपियन शुगर्स येथे रक्तदान शिबिरामध्ये परिचारक बोलत होते.
पुढे बोलताना परिचारक म्हणाले कि, रक्तदान हे श्रेष्ठदान आहे.वाढत्या लोकसंख्येबरोबर वाढत्या आजाराचे प्रमाण व अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्या नुसार आवश्यक असणारे रक्त उपलब्ध होऊ शकत नाही. समाजामध्ये रक्तदानाविषयी असणारे गैरसमज दूर होणे गरजेचे आहे. रक्तदान ही लोक चळवळ व्हावी या करीता समाजामध्ये जागृती होणे गरजेचे आहे. व युटोपियन ने आयोजित केलेले हे रक्तदान शिबीर व सामाजिक क्षेत्रातील योगदान हे आदर्शवत आहे.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक मुख्यशेती अधिकारी धनंजय व्यवहारे यांनी केले तसेच पांडुरंग परिवाराचे जेष्ठ नेते सुरेश आगावने यांनी मनोगत व्यक्त केले. माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या हस्ते युटोपियन शुगर्सचे कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
सत्कारास उत्तर देताना कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील म्हाणाले कि, पाडुरंग परिवाराने माझ्यावरती विश्वास टाकून जबाबदारी दिली आहे. वाढदिवस साजरा करणे हा आमचा उद्देश नव्हता मात्र, आमच्या खाते प्रमुखांनी सामाजिक बांधीलकीतून रक्तदाना शिबिरासारख्या कार्यक्रमाचे आयोजन करीत असल्याचे सांगितल्याने आपण हा वाढदिवस साजरा करण्यास मंजुरी दिली.या पुढे ही युटोपियनच्या माध्यमातून परिचारक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिकक्षेत्रात कार्यरत राहणार असल्याचे मत उत्तमराव पाटील यांनी व्यक्त केले.
सदर प्रंसंगी युटोपियनचे संस्थापक चेअरमन उमेशराव परिचारक, प्रतिश परिचारक, ऋषिकेश परिचारक, डॉ शरद शिर्के, डॉ पाचकवडे, भिमा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राजूबापू गावडे, बाबासो पाटील सो. जि. मध्य. सह. बँकेचे सिनी. बँक इन्स्पेक्टर गांडुळे सो , मिलिंद देशपांडे, शेळवे कॉलेजचे रजिस्टार गणेश वाळके, नागनाथ मोहिते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रमेश गजरे, सचिव कुमार घोडके, कर्मयोगी पतसंस्थेचे सचिव सीताराम शिंदे यांच्यासह युटोपियनचे सर्व खातेप्रमुख, अधिकारी व कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थितीत होता. कार्यक्रमाचे आभार व सूत्रसंचालन सेल अकाऊंटंट लक्ष्मण पांढरे यांनी केले