👁 9 Views

विद्यार्थ्याला लाथा बुक्यांनी बेदम मारहाण….

 

बेल्हे – ज्ञानमंदिर महाविद्यालय आळे (ता.जुन्नर) येथे अकरावीच्या सायन्स मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षका विषयी शेरो शायरी केली म्हणून चिडून जाऊन शिक्षक आणि शिपायांनी बेदम मारहाण केल्याने दोघांवर आळेफाटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबात आळेफाटा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी सकाळी 7:45 ते 8:00 वाजण्याच्या दरम्यान ज्ञानमंदिर हायस्कूल व कॉलेज आळे (ता.जुन्नर) येथे कॉलेजचे आवारात अल्पवयीन विद्यार्थी बालक (वय १७ वर्ष, राहणार नवलेवाडी, पिंपरी पेंढार तालुका जुन्नर जिल्हा पुणे) यास तो कॉलेजमध्ये शेरेबाजी केलेच्या कारणावरून आळे कॉलेजचे उपप्राचार्य जयसिंग जाधव व शिपाई सोमनाथ कुऱ्हाडे (दोन्ही राहणार तालुका जुन्नर जिल्हा पुणे) यांनी शिवीगाळ करून हाताने लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आहे.


यातील पीडित बालकांचे नातेवाईकांनी तक्रार देण्यास असमर्थता दर्शविल्याने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलिस कॉस्टबल अमित निवृत्ती माळुंजे यांचे तक्रारीवरून वरील दोघांवर आरोपी विरुद्ध आळेफाटा पोलीस स्टेशन येथे भादवी कलम 323, 504, 34, सह बाल न्याय अधिनियम काळजी व संरक्षण 2015 चे कलम 75,


बाल न्याय अधिनियम मुलांची काळजी व संरक्षण 2000 चे कलम 23 प्रमाणे सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद दिली असून पुढील तपास सहायक पोलीस निरिक्षक सुनील बडगुजर यांचे मार्गदर्शनाखाली -पोलीस उपनिरीक्षक पवार हे करीत आहेत.तर झालेली घटना चुकीची दोषींना जास्तीत जास्त कडक शासन होईल याबाबत संचालक मंडळ निर्णय घेऊ असे ज्ञानमंदिर महाविद्यालय आळे अध्यक्ष भाऊदादा कुऱ्हाडे यांनी बोलताना सांगितले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *