पंढरपूर Live 6 NOVEMBER 2017
दि. 6 नोव्हेंबर, 2017
वृ.वि. 7147 15 कार्तिक, 1939 (सायं. 5.10)
‘जय महाराष्ट्र‘ कार्यक्रमात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे
मुंबई, दि. 6 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र‘ कार्यक्रमात ‘ग्रामविकासातून महिला सबलीकरणाकडे ‘ या विषयावर ग्रामविकास,महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांची मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार, ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता प्रसारित होणार आहे. ही मुलाखत निवेदिका उत्तरा मोने यांनी घेतली आहे.
गेल्या तीन वर्षात ग्रामीण विकास विभाग आणि महिला व बालविकास विभागाअंतर्गत मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, झिरो पेडन्सी अभियान, माझी कन्या भाग्यश्री योजना, उमेद अभियान, बचत गटांचे सक्षमीकरण, कौशल्य विकास, स्मार्ट ग्राम योजना, आपले सरकार सेवा केंद्र, सर्वांसाठी घर, स्वच्छता अभियान, कुपोषणमुक्त गावं या योजना प्रभावीपणे राबविण्यात आलेल्या आहेत.या सर्व योजनांची सविस्तर माहिती “जय महाराष्ट्र” कार्यक्रमातून पंकजा मुंडे यांनी दिली आहे.
००००
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
प्रेरणादायी यशकथांचा लोकराज्य प्रकाशितमुंबई, दि. 6 : राज्य शासनाने गेल्या तीन वर्षांच्या कालावधीमध्ये राबविलेल्या विविध योजनांचा लाभ घेऊन सामाजिक व आर्थिक स्तर उंचावलेले नागरिक, उद्योजक , गाव यांच्या यशोगाथा सांगणारा लोकराज्यचा नोव्हेंबर 2017 चा ‘होय, हे माझं सरकार’ हा विशेषांक नुकताच प्रकाशित झाला आहे. हा अंक स्टॉलवर सर्वत्र उपलब्ध आहे.शासनाच्या योजनांचा लाभ घेत तसेच विविध मोहिमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होत नागरिकांनी गावागावांमध्ये शौचालय उभारले, गाव स्वच्छ आणि काही गावे टँकरमुक्त झाली. बेरोजगार तरुण-तरुणींनी मुद्रा बँक योजनेतून उद्योग स्थापन केला. प्रशासनाने अनेक सेवा ऑनलाइन देऊन नागरिकांच्या वेळेची बचत केली.जलयुक्त शिवार योजनेंर्गत अवर्षणग्रस्त भागातील अनेक गावे टँकरमुक्त व जलयुक्त झाली. या अंकात समावेश केलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील खामखेडा, खांडवा या गावांनी केलेली जलक्रांती आणि स्मार्ट, सुंदर आणि स्वच्छ गाव म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या अवनखेड या गावाची यशकथा प्रेरणादायी आहे. अशा प्रातिनिधिक यशकथांचा या अंकात समावेश करण्यात आला आहे. या अंकाची किंमत 10 रुपये आहे.००००
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
वृ.वि. 714615 कार्तिक, 1939 (सायं. 5.10) दि. 6 नोव्हेंबर, 2017 आज ‘विद्यार्थी दिन’मुंबई, दि. 6 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 7 नोव्हेंबर 1900 रोजी प्रतापसिंह हायस्कूल, राजवाडा चौक, जि. सातारा या शाळेत प्रवेश झाला. हा दिवस ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शाळाप्रवेश दिन म्हणजे एका अर्थाने शैक्षणिक क्रांतीचे पाऊल ठरले. शिक्षण हेच उन्नतीचे एकमेव साधन आहे आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या कठोर परिश्रमांची जाण सर्व विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने 7 नोव्हेंबर हा दिवस ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे.विद्यार्थी दिवसाचा मुख्य शासकीय कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण घेतलेले प्रतापसिंह हायस्कूल, जि. सातारा येथे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. ‘विद्यार्थी दिवस’ या उपक्रमांतर्गत सर्व शाळांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध पैलूंवर निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, काव्य वाचन इ. उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.००००
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
वृ.वि. 714115 कार्तिक, 1939 (दु. 3.00) दि. 6 नोव्हेंबर, 2017 लोकशाही दिनी 13 अर्जांवर कार्यवाहीमुंबई, दि. 6 : मंत्रालयात आज झालेल्या ऑनलाईन लोकशाही दिनी नागरिकांच्या विविध विभागांशी निगडीत 13 तक्रारींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ निर्णय घेतले.या 102 व्या लोकशाही दिनामध्ये महसूल विभाग, गृह विभाग, मदत व पुनर्वसन विभाग, नगरविकास विभाग, ग्रामविकास विभाग, वन विभाग, सामाजिक न्याय विभाग, पणन विभाग, जलसंपदा या विभागांशी संबंधित पुणे, ठाणे, लातूर, औरंगाबाद, बुलढाणा, अहमदनगर, अकोला, जळगाव, हिंगोली, अमरावती या जिल्ह्यांतील तक्रारींचा समावेश होता. ‘आपले सरकार’ वेब पोर्टल वरील तक्रार निवारण प्रणालीद्वारे प्राप्त झालेल्या 5 तक्रारींवरही यावेळी निर्णय घेण्यात आला.मालकी हक्काच्या जमिनीच्या संगणकीकृत 7/12 वरील नोंद दुरुस्त करण्याबाबतच्या शेंदुर्णी, ता. जामनेर (जि. जळगाव) येथील संजय जगन्नाथ कुमावत यांच्या अर्जावर मुख्यमंत्र्यांनी वस्तुस्थिती संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. श्री. कुमावत यांनी त्यांच्या मालकीच्या खरेदीने दिलेल्या क्षेत्राची नोंद संबंधित खरेदीदारांच्या नावाने संगणकीकृत सातबारावर झाली नाही, अशी त्यांची तक्रार होती. 7/12 उताऱ्यामध्ये ऑफलाईन काम करताना ही नावे समाविष्ट झाली. आता ही नावे ऑनलाईन एडिट प्रणालीद्वारे दुरुस्त करुन समाविष्ट करण्यात आली आहेत. त्याप्रमाणे तात्काळ ही नावे ऑनलाईन 7/12 वर येतील यासाठी कार्यवाही करुन श्री. कुमावत यांचे समाधान करावे, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.अनधिकृत बांधकाम पाडण्याबाबतच्या हडपसर (पुणे) येथील श्रीमती प्रभावती सुभाष घुले यांच्या तक्रारीवर मुख्यमंत्र्यांनी हे अतिक्रमण तात्काळ काढण्याचे आदेश जलसंपदा विभाग, गृह विभाग आणि पुणे महानगर पालिकेला दिले. अतिक्रमण पोलीस संरक्षणात येत्या 9 तारखेला काढण्यात येणार आहे हे मुख्यमंत्री महोदयांना अवगत करण्यात आले. संबंधित महिलेला तेथील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीकडून होत असलेल्या मारहानीबाबत गुन्हा दाखल करुन आवश्यकतेप्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.आत्तापर्यंतच्या लोकशाही दिनात 1411 तक्रारींपैकी 1403 तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. उर्वरित 8 आणि आजच्या लोकशाही दिनात स्वीकृत करण्यात आलेल्या 13 अशा 21 तक्रारींवर आज निर्णय घेण्यात आला.या लोकशाही दिनास मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव भगवान सहाय, मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव मेधा गाडगीळ, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, गृह विभागाचे प्रधान सचिव रजनीश सेठ, अतिरिक्त पोलिस महासंचालक बिपीन बिहारी, जलसंपदा विभागाचे सचिव सी. ए. बिराजदार व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.००००
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
वृ.वि. 714215 कार्तिक, 1939 (दु. 3.20) दि. 6 नोव्हेंबर, 2017 लाटव्हियाचे पंतप्रधान मॉरीस कुसिन्स्कीस यांचे प्रयाण
मुंबई, दि. 6 : लाटव्हियाचे पंतप्रधान मॉरीस कुसिन्स्कीस यांचे दोन दिवसांच्या मुंबई भेटीनंतर छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतलावरून सोमवारी पहाटे प्रयाण झाले. यावेळी उपसचिव (राजशिष्टाचार) सतीश जोंधळे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.००००वृ.वि. 714315 कार्तिक, 1939 (दु. 4.10) दि. 6 नोव्हेंबर, 2017 नागपूर महानगर विकास प्राधिकरणाच्याविविध प्रकल्पांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावामुंबई, दि. 6 : नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत राबविण्यात येत असलेल्या तसेच भविष्यात राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात घेतला. प्रधानमंत्री आवास योजनेतून एनएमआरडीए क्षेत्रात 25 हजार घरे बांधण्यासंदर्भातील प्रस्ताव येत्या दोन महिन्यात सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्राधिकरणाच्या बैठकीस नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. यावेळी नागपूर महानगर प्राधिकरणाच्या संकेतस्थळाचे तसेच त्यांनी जनहितार्थ तयार केलेल्या जाहिराती तसेच पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचे अनावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.नागपूर महानगर प्राधिकरणाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या तिर्थक्षेत्र विकासअंतर्गत श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानमधील कामे, विभागीय क्रीडा संकुल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वस्तुंचे जतन व संग्रहालयाचे आधुनिकीकरण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटर, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उभारण्यात येणारी घरे, चिखली (देव) येथील आदिवासी मुलांचे वसतिगृह, मोठा ताजबाग येथील दर्गा परिसराचा विकास आराखडा, दीक्षाभूमी स्तुपाचे नुतनीकरण, बुद्धिस्ट सर्किट अंतर्गत दीक्षाभूमी- नागपूर, शांतीवन-चिंचोली व ड्रॅगन पॅलेस या स्थळांचा विकास, सी प्लेन, कोराडी तलाव संवर्धन आदी विविध प्रकल्पांचा मुख्यमंत्री महोदयांनी आढावा घेतला. नागपूर सुधार प्रन्यासतर्फे सुरु असलेल्या या कामांना तसेच प्रस्तावित कामे प्राधिकरणामार्फत सुरू ठेवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, प्राधिकरणातील कामांसाठी माहिती तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करावा. तसेच प्राधिकरणाच्या क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दहा हजार परवडणारी घरे बांधण्यात येणार आहेत. आणखी 25 हजार घरांचा प्रस्ताव तयार करावा. तसेच शहरात उभारण्यात येणाऱ्या मलःनिसारण प्रकल्पासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात यावे.ग्राफिक विकास आराखडा तयार करण्याचे निर्देशनागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रात विकास नियंत्रण नियमावली सर्वसामान्य लोकांना समजावी, यासाठी या नियमावलीमध्ये रेखाचित्र दर्शविण्यात येणार आहे. यासाठी नागपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्टिटेक्टस् यांनी ग्राफिक डीसीआर तयार करून देण्याची तयारी दर्शविली आहे. विकास नियंत्रक आराखड्यात पहिल्यांदाच असा प्रयोग करण्यात येत आहे.यावेळी प्राधिकरणाच्या विविध प्रशासकीय बाबींवर चर्चा करण्यात आली. या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, आमदार सर्वश्री सुधाकर देशमुख, विकास कुंभारे, समीर मेघे, डॉ. मिलिंद माने, सुधाकर कोहळे यांच्यासह मुख्यमंत्री महोदयांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजयकुमार, प्राधिकरणाचे महानगर आयुक्त दीपक म्हैसेकर, नागपूर महानगरपालिका आयुक्त अश्विन मुदगल, पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कादंबरी बलकवडे आदी यावेळी उपस्थित होते.००००
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
नंदकुमार वाघमारे/वि.सं.अ./6.11.2017वृ.वि. 714415 कार्तिक, 1939 (दु. 4.15) दि. 6 नोव्हेंबर, 2017 दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या गव्हर्नरांनी घेतलीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटमुंबई, दि. 6 : दक्षिण ऑस्ट्रोलियाचे गव्हर्नर हायू वॅन ली एसी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मंत्रालयात भेट घेतली. यावेळी स्मार्ट सिटी, पायाभूत सुविधा, ऊर्जा, कृषी आदी विविध विषयांवर चर्चा झाली.गव्हर्नर श्री. ली यांच्यासोबत दक्षिण ऑस्ट्रेलियाचे सांस्कृतिक व युवा व्यवहार मंत्री झोय बेटिसन,गव्हर्नरांचे सचिव हुज बॉरोमन, आंतरराष्ट्रीय स्ट्रॅटेजिक व व्यापार विभागाचे संचालक नॅरली सिल्व्हॅक,ऑस्ट्रेलियाचे महावाणिज्यदूत टोनी हुबर आदींचा शिष्टमंडळात समावेश होता. यावेळी राजशिष्टाचार मंत्री प्रा. राम शिंदे, राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक, अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, प्रधान सचिव राजगोपाल देवरा आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात सर्वाधिक नागरिकरण आहे. त्यासाठी नागरी सुविधा पुरविण्यासाठी राज्य शासनाने 10 स्मार्ट सिटी उभारणार आहे. त्याचबरोबर पायाभूत सुविधांच्या विकासाठी मेट्रोचे जाळे, शेती क्षेत्रातील सुधारणा यावर राज्य शासन भर देत आहे. यासाठी ज्ञानाची व तंत्रज्ञानाची देवाण घेवाण दोन्ही राज्यांमध्ये व्हावी.गव्हर्नर श्री. ली यांनी भारत व ऑस्ट्रेलियाच्या सांस्कृतिक, शैक्षणिक व औद्योगिक संबंध दृढ असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, स्मार्ट सिटी, आर्टिफिशियल इंटिजिजन्स, शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी महाराष्ट्रास सर्वतोपरी सहाय्य करण्यास ऑस्ट्रेलिया तयार आहे. माहितीच्या देवाण घेवाणीतून दोन्ही राज्यामधील संबंध अधिक दृढ होतील.००००
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
नंदकुमार वाघमारे/वि.सं.अ./6.11.2017वृ.वि. 714515 कार्तिक, 1939 (दु. 4.35) दि. 6 नोव्हेंबर, 2017 उर्दू साहित्य अकादमीचे एकूण ११६ पुरस्कार घोषित१३ नोव्हेंबर रोजी होणार पुरस्कार वितरण– विनोद तावडेमुंबई, दि. 6 : उर्दू भाषेमधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी मार्फत विविध पुरस्कार घोषित झाले आहेत. आज या पुरस्कारची घोषणा अल्पसंख्याक विकास मंत्री विनोद तावडे यांनी केली. सन २०१५ व सन २०१६ वर्षाकरिता महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीमार्फत प्रदान करावयाच्या पुरस्कारांचे वितरण दि. १३ नोव्हेंबररोजी दुपारी ३ वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणार आहे.या समारंभास सन २०१५ करिता ५९ व सन २०१६ करिता ५७ अशा एकूण ११६ साहित्यिक/लेखक/कवी/पत्रकार/शिक्षक इ. प्रभृतींना महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी मार्फत पुरस्कार/स्मृतीचिन्ह/प्रमाणपत् र देवून सन्मानित केले जाणार आहे. उर्दू साहित्य अकादमीमार्फत देण्यात येणाऱ्या उर्दू भाषेमधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पारितोषिकेविजेत्यांची यादी
अ.क्र पारितोषिकाचे नाव २०१५ करिता २०१६ करिता १ मिर्झा गालिब जीवन गौरव पुरस्कार श्री. काझी अब्दुस सत्तार, अलीगढ श्री. फुजैल जाफरी, मुंबई २ वली दखनी राज्य पुरस्कार श्री. काझी मुश्ताक अहमद, पुणे श्री. वकील नजीब, नागपूर. 3 नवोदित साहित्यक पुरस्कार १.श्री. याहया जमील,अमरावती 1.श्रीमती असवद गौहर, औरंगाबाद २.श्री. फरहान हनिफ वारसी, मुंबई 2.श्री रशीद अशरफ, मुंबई ४ ले-आऊंट डिजाईनिंग पुरस्कार श्री. नाजीर नोमान सिघ्दीकी माहनामा शाईर मुंबई श्री. इश्तीयाक अहमद, उर्दू सर्कल की दुनिया,मालेगांव ५ उर्दू पत्रकारिता पुरस्कार १.श्री. सय्यद मोहम्मद अब्बास,दै. उर्दू न्यूज, मुंबई२.श्री. अन्सारी असगर जमील, संपादक, उर्दू मेला, नागपूर.३.श्री. काझी मखदूम, दै. तामिर, बीड४.श्री. मुर्शरफ शमसी, ठाणे सा. पहिली खबर, मीरा रोड ठाणे. १.श्री असीम जलाल,दै इन्किलाब मुंबई२.श्री रफीक अहमद मुश्ताक अहमद अन्सारी (खयाल असर मालेगांवी मालेगांव)३.श्री. मुन्शी मोहम्मद ईकबाल सफदर अली, दै. हिन्दुस्तान मुंबई४.श्री.मेराज अन्वर दै. राष्ट्रीय सहारा मुंबई. ६ विशेष पुरस्कार १.डॉ. ए. आर. उन्द्रे, जि. रायगड२.श्री मोहम्मद अली पाटणकर,मुंबई३.श्री अस्लम फकीह, भिंवडी, ठाणे४.श्री सय्यद फोरोज अशरफ,मुंबई५.श्री अब्दुल्ला हसन चौधरी,अहमदनगर६.श्री.मोहसीन अहमद बशीर अहमद,औरंगाबाद७.श्री. अब्दुल रऊफ इमाम खान,नवी मुंबई८.श्री. आय. जी. शेख, कोल्हापूर९.श्री. राजेन्द्र जोशी, पुणे१०.इंजिनियर श्री. हफीझ दुर्रानी जालना १. श्री. मुजतबा फारूकी खुलताबाद२. श्री. हारून रखानगी, मुंबई३.श्री नजिरूददीन, नागपूर४.श्री. जमील गुलरेज, मुंबई५.श्री. प्रकाश पाथरे, मुंबई६.श्रीमती सबीहा बेगम खान, बीड७.श्री. अब्दुल करीम अत्तार पुणे८.श्री. अन्सारी मुशीर अहमद, मुंबई९.श्री. अब्दुल वहीद, औरंगाबाद१०.श्री. ईक्बाल नियाजी, मुंबई ७ शिक्षण सेवा पुरस्कार (अ) विद्यापीठ पुरस्कार डॉ कीर्ती मालिनी विठठलराव जावळे औरंगाबाद ——- (ब) प्राध्यापक पदवी महाविद्यालय पुरस्कार १.डॉ. सरोशा काझी, जाकीर हुसैन कॉलेज, नागपूर२.डॉ. मुसर्रत साहेब अली, मुंबईृ३.डॉ. शर्फुनिहार, औरंगाबाद १.डॉ. अकोला गौस, अंबाजोगाई,बीड२.श्री. दानिश गणी, रत्नागिरी३.श्रीमती शाहिदा मुनाफ, बुलढाणा (क) स्कूल / ज्युनियर कॉलेज पुरस्कार १.श्री. मोहम्मद दानिश मोहम्मद जियाऊलहक, यवतमाळ२.डॉ. मोहम्मद खलील सिद्दीकी,लातूर३.श्री. कलिम अहमद मोहम्मद युनूस, नागपूर४.श्री.अबुल बारकात, भिवंडी,ठाणे५.श्री. एजाज मंजूर आलम
…
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर







