👁 8 Views

स्वेरीत पाचव्या टेक्नो सोसायटल थीम मिटींगचे थाटात उदघाटन

राष्ट्रविकास आणि प्रगतीसाठी थिम मिटींगचे योगदान अभिनंदनीय   !
-जिओ रिलायन्स इनोव्हेशन लॅबचे प्रमुख डॉ. मुनीर सय्यद

पंढरपूर Live 6 NOVEMBER 2017

 पंढरपूर- भारतातील ज्ञान आणि तंत्रज्ञान प्रगतीपथावर आहेच परंतु त्या ज्ञानाचा समाजासाठी उपयोग होण्याच्या दृष्टीने हे तंत्रज्ञान उत्पादनाच्या रूपाने समाजापर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. हे काम या थीम मिटींगमुळे होणार असल्याने मी स्वेरीचे अभिनंदन करतो. ग्रामीण भागाचा विकास हा राष्ट्र विकासासाठी आवश्यक असून आजच्या फस्त युगात आपल्या देशाला आणखी अतिजलद तंत्रज्ञान विकसित करणार्‍या संशोधकांची देखील गरज आहे. संशोधनामुळेच मोबाईलची प्रगती लक्षवेधी झाली आहे’ असे प्रतिपादन जिओ रिलायन्स इनोव्हेशन लॅबचे प्रमुख डॉ. मुनीर सय्यद यांनी केले.
               गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, पंढरपूर संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात आज अ‍ॅडव्हान्सड् टेक्नॉलॉजीज् इन सर्विस ऑफ रुरल इंडिया’ अर्थात ग्रामीण भागाच्या विकासासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान’ या विषयावर आयोजिलेल्या पाचव्या टेक्नो सोसायटल थीम मिटींगच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन जिओ रिलायन्स इनोव्हेशन लॅबचे प्रमुख डॉ. मुनीर सय्यद उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाभा अणुसंशोधन केंद्राचे माजी कंट्रोलर व राजीव गांधी सायन्स व टेक्नोलॉजी कमिशनचे सचिव डॉ. सुहास मार्कंडेय होते . दिपप्रज्वलनानंतर अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांनी पाचव्या टेक्नोसोसायटल थीम मिटींगच्या आयोजनाचा हेतू सांगून कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी उपस्थितांचे स्वागत करून संस्थेच्या यशस्वी वाटचाल सांगून विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञानच देत नाही तर त्याच्याबरोबरच संस्कार देखील दिल्यामुळे आपले करिअर तो विद्यार्थी  यशस्वीपणे घडवू शकतो. यासाठी कमवा व शिका’, प्राणायाम’ तसेच संशोधन क्षेत्रात आर. एच. आर. डी. एफ.’ व आर. अँण्ड डी.’ ही संशोधनाची दोन स्वतंत्र विभाग निर्माण झाल्यामुळे संशोधनासाठी विद्यार्थी सदा उत्साही असतो. त्यामुळे शिक्षणाबरोबरच तो इथे नवनवीन संशोधन करण्याचे धडे घेतो हे देखील महत्वाचे आहे.’ अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ.मार्कंडेय म्हणाले की, आपण जे संशोधन करतो त्याचा समाजाला भविष्यात फायदा झाला पाहिजे. असे तंत्रज्ञान निर्माण केले तर भारत देश संशोधनाच्या बाबतीत आणखी पाऊल पुढे टाकणार आहे.’पहिल्याच दिवशी बातमी पाठवेपर्यंत महाराष्ट्रातील आय. आय.टी., एन. आय.टी., शासकीय, अ‍ॅटोनॉमस व इतर विविध महाविद्यालयातून आलेल्या सुमारे 50 तरुण संशोधकांनी आपले शोध प्रकल्प सादर केले. यातील महत्वाच्या काही निवडक प्रकल्पांना राजीव गांधी सायन्स व टेक्नोलॉजी कमिशनकडून लाखो रुपयांचे अनुदान देखील मिळणार असल्याचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांनी सांगितले. यावेळी आय.आय.एस.सी., बेंगलोरच्या इंन्स्टुमेंटेशन विभागाचे अध्यक्ष डॉ. के राजण्णा, आय.सी. टी.मुंबईच्या रजिस्ट्रार डॉ. स्मिता लेले, एन.पी.सी.आय. एल.चे अतिरिक्त मुख्यअभियंता प्रभाकर गुंड्लापल्ली, आय.आय. एस.सी., बेंगलोरच्या सेंटर फॉर इन्फ्रास्ट्रक्चरचे अध्यक्ष डॉ.जे.एम. चंद्रकिशन, बी.ए.आर.सी.मुंबईचे शास्त्रज्ञ एम.शिवम, आय.आय.टी. मुंबईचे डॉ. राकेश मोटे, शासकीय महाविद्यालय, पुणेचे इमेरीटस प्राध्यापक डॉ. प्रशांतकुमार तसेच बी.ए.आर.सी.मुंबईचे माजी शास्त्रज्ञ डॉ अजित पाटणकर, संस्थेचे जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे, शिक्षक पालक संघाचे आबासाहेब दैठणकर, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. आर.जी. कुलकर्णी, अभियांत्रिकीचे उपप्राचार्य डॉ. एस.एन.कुलकर्णी, डिप्लोमाचे प्राचार्य प्रा. एन.डी.मिसाळ, अधिष्ठाता, विभागप्रमुख व प्राद्यापक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मीनल भोरे व प्रा. यशपाल खेडकर यांनी केले.

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *