पंढरपूर Live 7 NOVEMBER 2017
सोलापूर जिल्हा शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या वतीने बार्डी ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार
पंढरपूर – ‘ जनतेनी तुमच्यावर विश्वास दाखवत भरघोस मते दिली त्यामुळे तुम्ही निवडून आलात.आता त्यांनी तुमच्यावर टाकलेला विश्वास सार्थ करून दाखविण्याची वेळ आली आहे. तुम्ही असे कार्य करा की पुढच्या वेळी मतदारांना हात जोडून मते मागण्याची वेळ येणार नाही. तुमचे उत्कृष्ठकार्य पाहूनच तुम्हाला विजयी करण्याकरीता विरोधक देखील आपल्या ताफ्यात येतील.’असे प्रतिपादन शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हाप्रमुख डॉ. बी.पी.रोंगे यांनी केले.
आज कक्ष जिल्हाप्रमुख डॉ. बी.पी.रोंगे यांच्या निवासस्थानाजवळ असलेल्या सोलापूर जिल्हा शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष कार्यालयात आज बार्डी (ता. पंढरपूर) ग्रामपंचायतीमध्ये नव्याने निवडून आलेल्या सदस्यांचा सत्कार शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या वतीने करण्यात आला. यासत्कार सोहळ्याप्रसंगी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षचे जिल्हाप्रमुख डॉ. बी.पी.रोंगे ग्रामपंचायतनूतन सदस्यांना मार्गदर्शन करत होते. प्रारंभी उपजिल्हा कक्षप्रमुख सिद्धनाथ कोरे यांनी कार्यक्रमआयोजिण्याचा हेतू सांगितला. बार्डी (ता. पंढरपूर) मधील ग्रामपंचायतीच्या नूतन सदस्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कल्याण कवडे, हिम्मत कवडे, सुमित वसेकर, ज्ञानेश्वर वसेकर, अॅड.शंकर माळी हे ग्रामपंचायत सदस्य तसेच युवा नेते विलास माळी यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी पिराची कुरोलीचे उपकक्षप्रमुख दशरथ जावळेकर, शेळवे ग्रामपंचायत सदस्य अमिन शेख, गुरसाळे ग्रामपंचायत गणाचे संतोष शिंदे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सुरेश कदम यांनी केले तर उपजिल्हा कक्षप्रमुख सिद्धनाथ कोरे यांनी उपस्थितांचेआभार मानले.
छायाचित्र- बार्डी ग्रामपंचायतीमध्ये नव्याने निवडून आलेल्या सदस्यांचा सत्कार शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षचे जिल्हाप्रमुख डॉ. बी.पी.रोंगे यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी सोबत उपजिल्हा कक्षप्रमुख सिद्धनाथ कोरे व बार्डी ग्रामपंचायतीचे नूतन सदस्य.
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



