पंढरीतील खराब रस्ते व स्वच्छतेच्या प्रश्नावर आक्रमक बनल्या पंढरीतील सामाजिक संघटना…पंढरपूर नगरपालिके समोर केले ‘आक्रोश’ आंदोलन!
पंढरपूर Live 13 NOVEMBER 2017
पंढरपूर नगरपरिषदेने पंढरीतील विविध रस्त्यांची दुरावस्था व शहरातील अस्वच्छतेच्या प्रश्नाबाबत कोणतेही ठोस पाऊल अद्याप उचललेले नाही. हे व इतर प्रलंबित विकासकामे रखडलेली आहेत. पंढरपूर हे तिर्थक्षेत्र असल्याने शासन दरवर्षी नगर पालीकेस पाच कोटी रुपयांचे यात्रा अनुदान देते,तर शासनाकडून विकास आराखडया अंतर्गत कोटयावधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. तरीही अद्याप शहरातील विकास ठप्प झालेला आढळून येत आहे. याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून पंढरीतील विविध सामाजिक संघटना व कार्यकर्ते नाराज आहेत. विविध मार्गाने शहरातील या प्रलंबित प्रश्नाबाबत आवाज उठवूनसुध्दा प्रशासन याबाबत ठोस उपाययोजना राबवत नसल्याने अखेर आज सामाजिक कार्यकर्यांच्या पुढाकाराने शहरातील विविध सामाजिक संघटना व कार्यकर्ते यांनी एकत्रीतपणे पंढरपूर नगरपरिषदेसमोर कचरा ओतून “आक्रोश” आंदोलन केले. पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले व मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी हे प्रश्न सोडविण्याबाबत आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
पंढरपूर शहरातील खराब रस्ते,धुळीचे साम्राज्य,डेंग्यू मलेरिया चिकनगुनीया सारख्या जिवघेण्या आजाराची शहरात पसरलेली साथ,कोटयावधी रुपये खर्ची पडूनही शहरात होत असलेली निकृष्ट दर्जाची कामे यासंदर्भात नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असतानाही प्रशासन “हाताची घडी आणी तोंडावर बोट ठेवून” दखल घेत नसलेने याविरोधात सोमवार दिनांक 13/11/2017 रोजी सकाळी 10;30 वाजता पंढरपुर मधील विविध सामाजिक संघटनां एकत्रित येऊन पंढरपुर नगरपालिका समोर कचरा व धुळ माती फेकुन आक्रोश आंदोलन केले.
यावेळी समाजिक संघटना बहुजन मुक्ती पार्टी, शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र, राज्य संत रोहिदास संघटना, मनसे ,धनगर समाज उन्नती मंडळ,आण्णाभाऊ साठे युवक संघटना, बहुजन रयत परिषद, कोळी महासंघ नाभिक सेवा संघ.,
संभाजी ब्रिगेड स्फूर्ती प्रतिष्ठान, सत्यशोधक प्रतिष्ठान मी वडार महाराष्ट्राचा, शरद क्रिडा व संस्कृती प्रतिष्ठान ,भारतीय नरहरी सेना राष्ट्रवादी नाभिक सेना, अखिल भारतीय सफाई मजकूर संघ ,पंढरीरत्न प्रतिष्ठान ,दलित स्वयंसेवक संघ ,पिपल्य रिपब्लिकन पार्टी, स्वाभिमान रिपब्लिकन पक्ष, इ, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर