सोलापूर : मी निवृत्त होत आहे. ही माझी रिटायरमेंट आहे. असं जाहीरपणानं सांगितलं आहे. नवीन पिढीने पुढे आलं पाहिजे या मताचा मी आहे,” असे सांगत माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी पुढील लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे संकेत दिले आहेत.
बालदिनानिमित्त काँग्रेस भवनात पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ते बोलत होते. येत्या लोकसभा निवडणूक सोलापूरची जागा शिंदे यांनीच लढवावी असा आग्रह काँग्रेस कार्यकर्त्यातून होत आहे. त्याबाबत आमदार प्रणिती शिंदे यांनीही काही दिवसांपूर्वी महापालिकेत सुतोवाच केले होते.
या पार्श्वभूमीवर शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले, “लोकसभा निवडणुकीसाठी आता नव्या लोकांनी पुढे यावे. जे फायटर (लढाऊ) आहेत, ज्यांचे वक्तृत्व चांगले आहे अशा लोकांनी पुढे यायला पाहिजे. आपल्या मतदारसंघातील समस्या व बाजू जे आक्रमकपणे लोकसभेत मांडतील त्यांनाच निवडून देण्याची भूमिका मतदारांनी घेतली पाहिजे.”

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर