👁 5 Views

शहीद अशोक कामटे संघटनेच्या ब्लड ऑन कॉल याला चांगला प्रतिसाद, रक्तदाते वाढले

शहीद अशोक कामटे संघटनेच्या ब्लड ऑन कॉल याला चांगला प्रतिसाद, रक्तदाते वाढले
पंढरपूर Live 15 NOVEMBER 2017

सांगोला (प्रतिनिधी):-शहीद अशोक कामटे संघटनेच्या वतीने  सुरु करण्यात आलेल्या मोफत ब्लड ऑन कॉल याला दोन वर्ष झाले. दोन वर्षात सांगोला, पढरपूर, माढा, माळशिरस  व करमाळा तालुक्यातील 189 रुग्णांनी याचा फायदा घेतला. रक्तदात्यांचा प्रवास खर्चही संस्थेने केला. 100 टक्के मोफत सेवा संस्थेने बजावल्यामुळे गतवर्षी 950 रक्तदाते होते.या वर्षापासून 1100 रक्तदाते स्वयंस्फुर्तीने तयार झाले आहेत. लाभ घेणाऱ्या रुग्ण व नातेवाईकांनी या उपक्रमाला धन्यवाद दिले आहेत.अनेक वेळा गरजू रुग्णांना विविध गटातील रक्ताची गरज भासते.अशा वेळी आवश्यक असणाऱ्या गटाचे रक्त वेळेत मिळत नाही. त्यासाठी वेळ व पैसा फुकट वाया जातो. तोपर्यंत रुग्णाचा जीव टांगणीला लागलेला असतो. या सर्व बाबींचा विचार करून संघटनेने 26 नोव्हेंबर 2015 पासून ब्लड ऑन कॉल ही मोफत रक्त पुरवठ्याची योजना आखली. रुग्णांनी फोन करताच मोफत रक्तपुरवठा येथील संस्थेच्या रक्तदात्यांनी गेली वर्षभर केला आहे.

गतवर्षी त्याचा 68 पुरुष व 29 स्त्री रुग्णांनी मोफत लाभ घेतला आहे. यामध्ये सांगोला पंढरपूर, माढा, माळशिरस, व करमाळा तालुक्यातील रुग्णांचा समावेश आहे. ही योजना संपूर्ण जिल्ह्यासाठी चालू आहे. हा उपक्रम पाहून गतवर्षी 1100 रक्तदाते आपणहून रक्त देण्यासाठी विविध गटाचे 25 रक्तदाते प्रत्येक दिवशी हजर असतात. कॉल आला की ते तत्काळ नियोजित ठिकाणी पोहोचतात. त्यांचा येण्याजाण्याचा खर्च शहीद अशोक कामटे संघटना करते. रुग्णांनी संपूर्णपणे मोफत रक्तपुरवठा केला जातो. तोही आपलेपनाने. पंढरपूर साठी एका तासात, माढा, करमाळा साठी 3 तासात रक्तदाते नियोजित ठिकाणी पोहचत होते. गेल्या वर्षी 84 पैकी ओ पॉझीटीव्ह रक्ताला जास्त मागणी होती. काही रुग्नाणा बॅंकेत संकलित केलेले रक्त चालत नाही. व अशा वेळी रक्तदात्याकडून सरळ रक्त घेणे मोठे खर्चिक असते. म्हणून संघटनेने संस्थापक अध्यक्ष निलकंठ शिंदे सर यांनी ही योजना संघटनेच्या सभासदापुढे मंाडली. व ती गेल्या 2 वर्षापासून चांगल्या प्रकारे चालू आहे. ज्यांना रक्त पाहिजे असे त्या रुग्णांनी  9433272441, 9657755050,9403452950 या नंबरवर 24 तास 365 दिवस संपर्क साधू शकतात. असे आवाहन संस्थापक सचिव अच्युतराव फुले यांनी केले आहे.
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *