पंढरपूर Live 18 NOVEMBER 2017
पंढरपूर (प्रतिनिधी):- पुणे जिल्हा, दौंड तालुक्यातील पाटस येथे भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो नाभिक समाजाचा एकेरी उल्लेख करीत अपमानास्पद उद्गार काढले आहेत, त्याच्या निषेधार्थ मंगळवेढा येथील सकल नाभिक समाज बांधवांनी आपापली सलुन दुकाने बंद ठेवून भव्य मोर्चा काढला. दामाजी चौक, शिवप्रेमी चौक, चोखामेळा चौक, मुरलीधर चौक या मार्गे प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा गेला. येथे प्रांताधिकार्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अनेक समाजबांधव उपस्थित होते. मंगळवेढा शहर व तालुका नाभिक समाज व महाराष्ट्र नाभिक समाजाच्या हा मोर्चा काढण्यात आला.
आज सकाळी मंगळवेढ्यातील संत दामाजी चौकातून मोर्चा निघाला. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या समाजाच्या अपमानास्पद शब्दांचा निषेध व्यक्त करत व तशा घोषणा देत नाभिक समाजबांधवांचा हा मोर्चा मंगळवेढा प्रांत कार्यालयावर गेला. येथे प्रांताधिकार्यांना आपल्या मागण्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी अनेक समाजबांधव मोठया संख्येने उपस्थित होते. आज मुख्यमत्र्यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ मंगळवेढा शहर व तालुकयातील सर्व नाभिक समाज बांधवांनी आपापली सलुनची दुकाने बंद ठेवली होती.
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर





