👁 7 Views

आत्मसन्मानासाठी सकल नाभिक समाजबांधवांचा पंढरीत भव्य मोर्चा



पंढरपूर Live 18 NOVEMBER 2017

पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूर (प्रतिनिधी):- पुणे जिल्हा, दौंड तालुक्यातील पाटस येथे भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो नाभिक समाजाचा एकेरी उल्लेख करीत अपमानास्पद उद्गार काढले आहेत, त्याचा निषेध करण्यासाठी आज पंढरपूर शहरातील सकल नाभिक समाज बांधवांनी आपापली सलुन दुकाने बंद ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध व्यक्त करत भव्य मोर्चा काढला. 

आज सकाळी 11 वाजता श्रीसंत सेनामहाराज मठामध्ये हजारोंच्या संख्येने नाभिक समाज बांधव जमा झाले. प्रत्येकाच्या मनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आापल्या समाजाबाबत अपमानास्पद अपशब्द वापरल्याची खदखद साठलेली होती. समाजाचा जातीवाचक शब्दांनी केलेला हा अपमान सर्वांच्याच जिव्हारी लागलेला आढळला. पुरोगामी  महाराष्ट्रात खुद्द या राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांकडूनच नाभिक समाजाचा जातीवाचक अपशब्दाने उल्लेख करुन समाजाचा अपमान होत असेल तर ही बाब निंदनीय आहे. याच्या निषेधार्थ आज सबंध महाराष्ट्रातील नाभिक समाज बांधव रस्त्यावर उतरला होता. तसाच पंढरीतील समाजही रस्त्यावर उतरला होता.

 श्रीसंत सेना महाराज मठ येथून सकाळी 11 वाजता सकल नाभिक समाज बांधवांचा मोर्चा निघाला. या मोर्चामध्ये अबालवृध्दांपासून सर्वजण सहभागी होते. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या समाजाच्या अपमानाच्या निषेधार्थ, मुख्यमंत्र्यांनी समाजाची जाहीर माफी मागीतलीच पाहिजे! अशा प्रकारच्या घोषणा दिल्या जात होत्या. हा मोर्चा छत्रपती शिवाजी चौकातून स्टेशन रोड मार्गे पंढरपूर तहसिल कार्यालयात धडकला. तहसिल कार्यालयात समाजाच्या वतीने तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात मुख्यमंत्र्यांनी पाटस येथे नाभिक समाजाबद्दल काढलेले अनुद्गाराचा निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे. व यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी करण्यात आली आहे. जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर नाभिक समाज बांधव यापुढे आत्मसन्मानार्थ पुढील काळात उग्र आंदोलन करेल. असा इशारा देण्यात आला. आहे. या मोर्चात पंढरपूर शहर व तालुक्यातील हजारो नाभिक समाज बांधव सहभागी झाले होते. मुख्यमंत्र्यांनी नाभिक समाजबांधवांच्या सन्मानाला ठेच पोहोचेल असे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आज पंढरीतील नाभिक समाज बांधवांनी सर्व सलुन दुकाने बंद ठेवली होती.
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *