👁 8 Views

प्रियाच्या आवाजात सादर झाले ‘गच्ची’चे मोशन पोस्टर



पंढरपूर Live 22 NOVEMBER 2017

प्रियाच्या आवाजात सादर झाले ‘गच्ची’चे मोशन पोस्टर 

अनिल चौधरी, पुणे 


वाढत्या शहरीकरणाच्या युगात दोन घटका निवांत वेळ घालवण्याची हक्काची जागा म्हणजे गच्ची ! बालपणाच्या अनेक आठवणींची साक्ष असलेल्या या ‘गच्ची’सोबत अनेकांचे भावनिक ऋणानुबंध जोडले गेले आहेत. अशी ही प्रत्येक वयोगटातील लोकांना हवीहवीशी वाटणारी जागा, आता सिनेमाच्या रुपात लोकांसमोर येत आहे. लँडमार्क फिल्म्सच्या विधी कासलीवाल प्रस्तुत आणि नितीन वैद्य प्राॅडक्शन्स निर्मित ‘गच्ची‘ असे या सिनेमाचे नाव असून, हा सिनेमा येत्या २२ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. 

प्रिया बापट आणि अभय महाजनची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाचा नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर मोशन पोस्टर लाँच करण्यात आला. प्रिया बापटचा आवाज लाभलेल्या या मोशन पोस्टरमध्ये प्रिया ‘गच्ची’ ला संबोधून बोलत असलेले दिसून येते. जीवनाची अविभाज्य घटक बनलेली ही ‘गच्ची’ किती खास आहे, याची जाणीव तिच्या या आवाजातून होते.  

सामान्य माणसांचे भावविश्व मांडणाऱ्या या सिनेमाचा मोशन पोस्टर प्रेक्षकांना आवडत असून, हा सिनेमा आपल्यासारख्या सामान्य माणसांवर आधारित आहे, अशी चर्चा सर्वत्र रंगताना दिसून येते. नचिकेत सामंत यांच्या दिग्दर्शकीय नजरेतून आणि योगेश विनायक जोशी लिखित मोठ्या पडद्यावर सादर झालेली ही ‘गच्ची’, नेमकी कशी असेल? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. 

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *