पंढरपूर Live 22 NOVEMBER 2017
तंत्रशिक्षण आणि सामाजिक ज्वलंत प्रश्न यांची सांगड घालण्याचे कौशल्य आत्मसात करावे
-एडीफिकोचे कार्यकारी अधिकारी वसीम दुराणी
पंढरपूर- विविध अभ्यासक्रमातून घेतलेले तंत्रशिक्षण आणि सामाजिक ज्वलंत प्रश्न यांची योग्य प्रकारे सांगड घालण्याचे कौशल्य प्रत्येकाने आत्मसात करणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे संगणक क्षेत्रात होणारी क्रांती लक्षात घेवून विद्यार्थ्यांना शिकविले जाणारे शिक्षण हे आटोपशीर होवून त्यांना लवकर संगणकीय ज्ञान लक्षात येण्यासाठी विकसित झालेले संगणक व झालेले बदल हे देखील विद्यार्थ्यांना शिक्षणात महत्वाची भूमिका बजावत आहे.’ असे प्रतिपादन एडीफिको टेक प्रायव्हेट लिमिटेडचे कार्यकारी अधिकारी वसीम दुराणी यांनी केले.

गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, पंढरपूर संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात कॉम्पुटर सायन्स अँण्ड इंजिनिअरिंग विभागात आय.ई.आय (सोलापूर लोकल सेंटर) कोलकाता व एडीफिको टेक प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवशीय कार्यशाळा आयोजिली होती. यात उदघाटक व प्रमुख पाहुणे म्हणून वसीम दुराणी मार्गदर्शन करत होते. प्रारंभी कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.वाय.आर.कलशेट्टी यांनी कार्यशाळा आयोजिण्याचा मुख्य हेतू सांगितला. आय.ई.आय (सोलापूर लोकल सेंटर) चे अध्यक्ष, स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी आय.ई.आय, कोलकाता ही व्यवसायिक संघटने अंतर्गत सुरु असलेल्या पेपर सादरीकरण, एस.टी.टी.पी., एफ.डी.पी. या अशा विविध कार्यक्रम राबविताना होत असलेल्या उपक्रमांवर मार्गदर्शन केले. तसेच या संघटनेचे सदस्य होण्यासाठी आवाहन केले. संपूर्ण दिवसभरात या कार्यशाळेत प्रकल्पातील किचकट प्रश्नांची सोडवणूक, सखोल अभ्यास या नवीन अभ्यासक्रमावर प्रात्यक्षिक व व्याख्यान असे कार्यक्रम पार पडले. यामध्ये राज्यातील विविध महाविद्यालयातील एकूण 47 प्राध्यापक व संशोधक सहभागी झाले होते. त्यांची संपूर्ण व्यवस्था उत्तम पद्धतीने केली होती. यावेळी प्रा. नरसाळे, यांच्यासह अधिष्ठाता, विभागप्रमुख,प्राध्यापक उपस्थित होते. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. एस.एल.उत्पात व प्रा. एस.ए. शेगदार यांनी केले तर विभागप्रमुख प्रा. व्ही. डी. जाधव यांनी आभार मानले.
छायाचित्र- स्वेरीत कॉम्पुटर सायन्स अँण्ड इंजिनिअरिंग विभागात एकदिवसीय कार्य्सालेचे उदघाटन एडीफिको टेक प्रायव्हेट लिमिटेडचे कार्यकारी अधिकारी वसीम दुराणी यांच्या हस्ते झाले याप्रसंगी सोबत डावीकडून प्रा. नरसाळे, आय.ई.आय (सोलापूर लोकल सेंटर) चे अध्यक्ष, स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, विभागप्रमुख प्रा. व्ही. डी जाधव व आदी

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर