👁 7 Views

शहीद अशोक कामटे सामाजिक संघटनेतर्फे सांगोला येथे रविवारी रक्तदान शिबीराचे आयोजन

शहीद अशोक कामटे सामाजिक संघटनेतर्फे सांगोला येथे रविवारी रक्तदान शिबीराचे आयोजन

पंढरपूर Live 25 NOVEMBER 2017

सांगोला (प्रतिनिधी):- शहीद अशोक कामटे सामाजिक संघटनेमार्फत 26 नोव्हेंबर दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवान, नागरिक यांच्या स्मरणार्थ व भारतीय संविधान दिनानिमित्त रविवार दि.26 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी 8 ते सायं.5 या वेळेत विटा बॅंकेजवळ, स्टेशन रोड, सांगोला येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
गेल्या 9 वर्षापासून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असते. भारतीय संविधान दिनानिमित्त तसेच मुंबई येथील आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांना श्रध्दांजली अर्पण करण्याच्या कार्यक्रमाप्रसंगी आपण उपस्थित राहून श्रध्दांजली अर्पण करावी. 
सध्या रक्ताची टंचाई असल्यामुळे आपल्या सहकार्याची गरज आहे. यापुर्वी सुध्दा आपणामार्फत कामटे संघटनेच्या विनंतीस मान देवून  या सामाजिक उपक्रमात सहभागी झाले असून भविष्यात गरजू रुग्णांना रक्ताची गरज भागविण्यासाठी आपल्या रक्तदान करण्याच्या आवाहनामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो. म्हणून अशा सामाजिक कार्यास आपली मदत व्हावी, या हेतूने शहीदांना श्रध्दांजली रक्तदानाने अर्पण करावी. भविष्यात रुग्णांना रक्त उपलब्ध होणे हे पवित्र कार्य आपल्या मार्फत होणेकामी आपण या रक्तदानात सहभागी व्हावे, असे आवाहनही कामटे संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.
ब्लड ऑन कॉल योजनेची नोंदणी :
रक्तदान शिबिरावेळी दिवसभर संघटनेच्या ब्लड ऑन कॉल साठीही नोंदणी सुरु राहिल. ही योजना प्रामुख्याने गरजू लोकांना रक्तपुरवठा उपलब्ध करुन देण्यासंबंधीची योजना आहे. योजनेसाठी संघटनेकडून 9423327241, 9657755050 हे संपर्क क्रमांक असतील. यामध्ये वर्षभर ऐनवेळी रक्त देवू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी नाव नोंदणी चालू राहिल. तरी जास्तीत जास्त नागरीकांनी या शिबिरासाठी उपस्थित रहावे.

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *