शहिद स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात शहिद मेजर कुणाल गोसावी स्मृतीदिन:
29 रोजी वाखरीत कार्यक्रम
पंढरपूर Live 26 NOVEMBER 2017
पंढरपूर: प्रतिनिधी
काश्मीर मधील नागरोटा येथे दहशतवाद्यांशी लढताना शहिद झालेल्या शौर्यचक्रवीर मेजर कुणाल गोसावी यांचा प्रथम स्मृती दिन येत्या 29 नोव्हेंबर रोजी साजरा होत असून पंढरपूर तालुक्यात यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे. गोसावी कुटूंबीयांच्यावतीने ज्या ठिकाणी मेजर कुणाल यांच्याावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच जागेवर शहिद स्मारक उभा करण्यात आले आहे. या स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात आले असून 29 नोव्हेंबर रोजी स्मारकाचा लोकार्पण सोहळा होणार आहे.
येथील शुरवीर मेजर कुणाल मुन्नागीर गोसावी हे 29 नोव्हेंबर 2016 रोजी काश्मीरमधील नगरोटा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले होते. मेजर कुणाल यांच्या बलीदानानंतर पंढरपूर शहर आणि तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली होती. त्या बलीदानाचा प्रथम स्मृतीदिन 29 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येत आहे. शहिदाच्या पराक्रमांना ऊजाळा देण्यासाठी तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे.
वाखरी ( ता.पंढरपूर) या मेजर कुणाल यांच्या मुळ गावी गोसावी कुटूंबीयांच्यावतीने शहिद स्मारक ऊभा करण्यात येत आहे. ज्याठिकाणी शहिद कुणाल गोसावी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्याठिकाणी हे स्मारक ऊभा करण्यात आले आहे. स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात आले असून 28 तारखेपर्यंत काम पुर्ण होणार आहे. ब्रिगेडियर सुनिल बोधे यांच्याहस्ते 29 रोजी स्मारकाचा लोकार्पण सोहळा होणशर आहे. यावेळी निवृत्त कर्नल सुहास जानकर, नि. कॅप्टन सुनिल गोडबोले आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. यावेळी गोसावी कुटूंबीयांकडून सोलापूर जिल्ह्यासह परिसरातील शहिद जवानांच्या नातेवाईकांचाही सन्मान करण्यात येणार आहे.
दरम्यान पंढरपूर शहरात यानिमित्ताने विविध संस्था, शैक्षणिक संस्था, संघटना, राजकीय पक्षांकडूनही देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर






