👁 8 Views

*कुरूल येथील जुगार व मटका आड्डयांवर पोलीस अधीक्षक यांच्या विशेष टीमचा छापा* *1 लाख 3 हजारांच्या मुद्देमालासह 7 आरोपींना घेतले ताब्यात*

*कुरूल येथील जुगार व मटका आड्डयांवर पोलीस अधीक्षक यांच्या विशेष टीमचा छापा*

*1 लाख 3 हजारांच्या मुद्देमालासह 7 आरोपींना घेतले ताब्यात*

पंढरपूर Live 29 NOVEMBER 2017

   सोलापूर:- .पोलीस अधीक्षक श्री.विरेश प्रभू सर यांचेकडे आलेल्या तक्रारीवरून व त्यांच्या आदेशान्वये अवैध धंद्यावर कारवाई करणेकामी कामती पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना दि 28-11-2017 रोजी सायं 6-00 वा चे सुमारास कुरूल येथील पंढरपूर रोडचे बाजूस ओढ्याच्या बाजूस बांधावर आंब्याच्या झाडाखाली चालत असलेल्या मन्ना नावाच्या जुगार आड्डयावर छापा टाकून आरोपी 1) नवनाथ मल्हारी गायकवाड, 2) दत्ताञय हणमंत पाटकर, 3) नाना नारायण बनसोडे, 4) अरूण दत्ताञय घोडके सर्व रा कुरूल ता मोहोळ यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून 23,680/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 
         तसेच कुरूल गावात चालत असलेल्या तीन ठिकाणी मटका आड्ड्यांवर छापा टाकून आरोपी 1) संतोष सुखदेव लांडे, 2) बळीराम जानोबा मोरे , 3) संतोष भालचंद्र अांबरे सर्व रा कुरूल ता मोहोळ यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून सुमारे 79,750/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर मटका मालकाबाबत चौकशी करीता त्यांची नावे 4) शहाजी पाटील, 5) अमोल खंदारे दोघे रा कुरूल, 6) रियाज मुजावर रा मोहोळ असे असल्याचे समजल्याने सर्व 10 आरोपी विरूद्ध कामती पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
          सदरची कारवाई  पोलीस अधीक्षक श्री विरेश प्रभू सर यांच्या मार्गदशनाखाली विशेष टीम मधील स.पो.नि संदीप धांडे, पो.हे.काँ अंकुश मोरे, पो.ना अमृत खेडकर, पोकाँ सुरेश लामजने, अमोल जाधव, अभिजीत ठाणेकर, अनुप दळवी, सचिन कांबळे, सागर ढोरे पाटील, महादेव लोंढे यांच्या  टिमने हे काम केले आहे.


14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *