👁 10 Views

पंढरपूर तालुक्यातील कु. शैला शिंदेस कलाक्षेत्रातील ‘समता गौरव‘ पुरस्कार जाहीर

समता गौरव पुरस्कार जाहीर…२ डिसेंबर रोजी वितरण
पंढरपूर Live 29 NOVEMBER 2017
फुलचिंचोली(प्रतिनिधी):- पंढरपूर तालुक्यातील फुलचिंचोली येथील महात्मा फुले समता परिषद यांच्या वतीने सालाबादप्रमाणे क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त देण्यात येणारे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत,अशी माहिती तालुकाध्यक्ष चंद्रशेखर जाधव व सावता जाधव यांनी दिली.
          समता गौरव पुरस्कार२०१७साठी सामाजिक पुरस्कार-राजाभाऊ अंकुशराव,पत्रकारिता-चंद्रकांत माने,कला-कु.शैला शिंदे,साहित्य-रवी सोनार,शैक्षणिक-पद्माकर चवरे,कृषी-शशिकांत पुदे यांना घोषित करण्यात आले आहेत.
        हा पुरस्कार वितरण सोहळा२डिसेंबर रोजी सायंकाळी६.००वा. फुलचिंचोली येथे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजयकुमार देशमुख,जि. प.अध्यक्ष संजयमामा शिंदे,आ.भारत (नाना)भालके, आ.प्रशांतराव परिचारक,शिक्षक आ.दत्तात्रय सावंत,सावता परिषद संस्थापक कल्याण आखाडे,समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष दत्तात्रय घाडगे,मा.जिल्हाध्यक्ष बाळासाहेब माळी,भाजपा कार्यकारिणी सदस्य शंकरराव वाघमारे,मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर,दै. पंढरी भुषणचे संपादक शिवाजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा व समता मेळावा सपंन्न होणार आहे.
     हा पुरस्कार वितरण सोहळा यशस्वी करण्यासाठी भाजपा ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष शाम गोडसे,शाखाध्यक्ष शंकर बनसोडे,राजू गायकवाड, नागनाथ जाधव, ग्रा. प.सदस्य जयंता जाधव, समाधान जाधव, दिनेश जाधव, माऊली पिसे,टिल्लू गायकवाड, अमोल जाधव,मुन्ना जाधव आदी परिश्रम घेत आहेत.


14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *