पंढरपूर Live 29 NOVEMBER 2017
सोलापूर दि.29 :- सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयामार्फत जागतिक अपंग दिनानिमित्त दि. 3 डिसेंबर 2017 रोजी जिल्ह्यातील धर्मादाय रूग्णालयाच्या सहकार्याने रूग्णालय तुमच्या दारी हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमातून झोपडपट्टी, रस्त्यावरील गरीब रूग्णांना मोफत उपचार देण्यात येणार असून गरीब कुटूंबातील सदस्यांची प्राथमिक मोफत वैद्यकीय तपासण्या करण्यात येणार आहेत.
रूग्ण्यालयांची नावे व तपासणी ठिकाणे अशी :- 1. युगंधर होमिओपॅथिक हॉस्पिटल, सोलापूर – कल्याण नगर भाग 1,सोलापूर. 2. श्रीमती मल्लव्वाबाई कलयाळ चॅरिटेबल डेंटल, गणेश पेठ शॉपिंग सेंटर, सोलापूर – इंदिरा नगर झोपडपट्टी संघ, कुचन नगर, महाराजा गणपती येथे सोलापूर. 3. शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालय, सोलापूर संचलित शेठ सखाराम नेमचंद जैन आयुर्वेद हॉस्पिटल, सोलापूर – ब्रिजधाम वृध्दाश्रम, सोलापूर. 4. श्रीमती मल्लव्वाबाई वल्याळे मेमो. चॅरिटेबल ट्रस्ट, डेंटल हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर सोलापूर, केगांव – ग्रामपंचायत हिरज, ता.उ.सोलापूर जि. सोलापूर. 5. कासलीवाल हॉस्पिटल, सोलापूर – मौजे तामलवाडी, ता. तुळजापूर, जि.उस्मानाबाद. 6. अश्विनी रूरल मेडीकल कॉलेज हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, कुंभारी, सोलापूर – विडी घरकुल, कुंभारी. 7. लायन्स ब्रिजमोहन फोफलियन नेत्रालय – थोबडे वस्ती, देगांव रोड, सोलापूर. 8. सिध्देश्वर कॅन्सर हॉस्पिटल, सोलापूर – विडी घरकुल, अक्कलकोट रोड, सोलापूर. 9. यशोधरा हॉस्पिटल, सोलापूर – गाव समाज मंदिर, मु.पो. हगलूर, ता.उ.सोलापूर. 10. गांधीनाथ रंगजी हॉस्पिटल, सोलापूर – जैन बोर्डींग विद्यानंद बँकेशेजारी, बाळीवेस, सोलापूर. 11. नर्सिंग दत्त कॅन्सर हॉस्पिटल, बार्शी – पंडीत जवाहरलाल नेहरू न.पा.शाळा क्र.14,सुभाष नगर, बार्शी. 12. जगदाळे मामा हॉस्पिटल, बार्शी – पंडीत जवाहरलाल नेहरू न.पा.शाळा क्र.14,सुभाष नगर, बार्शी. 13. विठ्ठल हॉस्पिटल, पंढरपूर – बंकट स्वामी महाराज मठ, संभाजी चौक, पंढरपूर, जि. सोलापूर. 14. जनकल्याण हॉस्पिटल, पंढरपूर – बंकट स्वामी महाराज मठ, संभाजी चौक, पंढरपूर, जि. सोलापूर. 15. अल फैज जनरल हॉस्पिटल, सोलापूर – अल फैज जनरल हॉस्पिटल, सिध्देश्वर पेठ, सोलापूर. 16. लोकमंगल जीवक हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर – जिल्हा परिषद शाळा, शिवगणेश मंदिर, करली चौक, निलम नगर, सोलापूर. 17. धनराज गिरजी रूग्णालय, सोलापूर – राज्य कामगार विमा योजना रूग्णालय, दमाणी नगर, सोलापूर.
या उपक्रमात संबंधितांनी सहभागी होऊन आपली प्राथमिक वैद्यकीय तपासणी करून घ्यावी असे आवाहन धर्मादाय उपआयुक्त प्र.म.चौधरी यांनी केले आहे.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




