👁 7 Views

सिंहगड येथे युवा सांसद स्पर्धा संपन्न..तालुका पोलीस पातळीवर 11 शाळा

युवा सांसद स्पर्धा कार्यक्रम प्रसंगी प्रमुख मान्यवर
पंढरपूर Live 29 NOVEMBER 2017


कोल्हापूर परिक्षेत्रातील विशेष महानिरीक्षक विश्वास नांगरे यांच्या कल्पनेतून पाच जिल्ह्यातून तरुणांना वाव मिळावा तसेच सामाजिक जागृती करिता शाळा स्तरावर उपक्रम राबवण्यासाठी युवा सांसद ही कल्पना पुढे आणली.याच कल्पनेचा उपक्रम पाच जिल्ह्यात तालुका ,जिल्हा,आणि राज्य पातळीवर राबवला जात असल्याची माहिती तालुका निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.

पंढरपूर तालुका पोलीस पातळीवरील युवा सांसद स्पर्धा कोर्टी येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात पार पडल्या.तालुक्यातील अकरा माध्यमिक विद्यालयातील प्रत्येकी तीन विद्यार्थी प्रमाणे 33 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.यामध्ये सोशल मीडिया शाप की वरदान,छेडछाड,गर्भलिंग तपासणी,वाहतूक नियंत्रण साठी नागरिक सहभाग,डॉल्बीमुक्त कार्यक्रम, रॅगिंग,बालक स्त्रियांवरील होणारे अत्याचार,भ्रष्टाचार आदी विषय देण्यात आले होते.या कार्यक्रमास तालुका पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे,निरीक्षक कुंदन गाडे ,गणेश शिंदे,सर्व शिक्षक, विदयार्थी तर परिक्षक सिद्धार्थ ढवळे एस एन येडवे यांनी काम पाहिले.

 युवा सांसद निकाल तालुका स्पर्धेचा अंतिम निकाल प्रथम क्रमांक शिवाजी पाटील विद्यालय रोपळे  द्वितीय क्रमांक हनुमान विद्यालय सुपली, तृतीय क्रमांक  दत्त विद्यामंदिर सुस्ते यांना सन्मान पत्र व एक सन्मान चिन्ह देऊन गौरणविण्यात आले.सहभागी विद्यार्थ्यांना ही सहभाग प्रमाण पत्र देण्यात आले. 


14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *