👁 8 Views

जागतिक अपंग दिनानिमित्त17 वर्षापासून चंद्रभागेतील समाधीस्थानांची पुजा करणार्‍या अपंग महिलेचा महर्षी वाल्मिकी संघाने केला सन्मान..!



पंढरपूर Live 4 December 2017

पंढरपूर (प्रतिनिधी):- आज दि. 3 डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. गेल्या 17 वर्षापासून पंढरीतील चंद्रभागेच्या वाळवंटातील साधु संतांच्या समाधीस्थानांची व देवदेवतांची पुजा-अर्चा अथकपणे करणार्‍या, चंद्रभागेच्या वाळवंटातच एका पर्णकुटीत आपले आयुष्य व्यथीत करत कुणाकडून कसलीही अपेक्षा न करता संतांची सेवा मनोभावे करणार्‍या एका अपंग महिलेचा सन्मान करुन महर्षी वाल्मिकी संघाकडून अपंग दिन साजरा करण्यात आला. अशी माहिती महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
मुळच्या मराठवाड्यातील परभणी येथील शिवकन्या (जिजाबाई) किसन काळे या 36 वर्षाच्या अपंग महिला भगिणी पंढरीतील चंद्रभागेच्या वाळवंटात गेल्या 17 वर्षापासून ऊन, वारा, पाऊस, माहापूर या कशाचीही पर्वा न करता एका पर्णकुटीत वास्तव्यास आहे. अपंग असूनही दररोज भल्या पहाटे, दुपारी व संध्याकाळी अशा तिन्ही वेळेला शिवकन्या पंढरीतील चंद्रभागेच्या वाळवंटातील सर्व साधु संतांच्या समाध्यांची व देवतांची पुजा अर्चा करतात. गेल्या 17 वर्षापासून या महिला भगिणीने आपल्या या सेवेत कसलाही खंड पडू दिलेला नाही. या सेवेसाठी तिने कधीही कुणाकडून कसलीही अपेक्षा केलेली नाही की याबाबत तिचा आजपर्यंत कधी कुणी सन्मान केलेला नाही.   
जागतिक अपंग दिन साजराच करायचा तर आपल्या या माऊलीचा सन्मान करुनच का करु नये? अशी एक संकल्पना मनात आली. व ती सत्यात उतरविण्यासाठी आम्ही सर्व महर्षी वाल्मिकी संघाचे कार्यकर्ते संघटीतपणे यासाठी कामाला लागलो. आज या महिला भगिणीचा यथोचित सत्कार करुन त्यांना सन्मान प्राप्त करुन दिला. ॥ का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुली। तोचि साधु ओळखावा। देव तेथेची जाणावा॥  या संत वचनानुसार आम्ही महर्षी वाल्मिकी संघाचे कार्यकर्ते कार्यरत आहोत. जिथं जिथं निरपेक्ष भावनेनं कार्य करणारी साधी माणसं आढळून येतील त्यांना यथोचित सन्मान देण्यासाठी आम्ही पुढं येतो. आज ही अशाच एका निरपेक्ष वृत्तीन साधुसंतांची सेवा करणार्‍या, चंद्रभागेच्या पात्राची स्वच्छता करणार्‍या, वाळवंटात आढळून आलेल्या देवदेवतांच्या जीर्ण छायाचित्र व दुभंगलेल्या मुर्त्यांची विटंबना न होऊ देता त्यांचे विसर्जन नदीपात्रात करणार्‍या एका अपंग माऊलीचा सन्मान केला. यावेळी बोलताना या माऊलीने महर्षी वाल्मिकी संघाचे आभार मानले व आपल्या मनातली खदखद ही व्यक्त केली. ‘‘माझ्यासाख्या अनेक अपंगांना जमीनीचं अंथरुन व आकाशाचं पांघरुन करत आपलं आयुष्य व्यथीत करावं लागतं. त्यांच्यासाठी किमान अन्न, वस्त्र, निवारा या मुलभुत गरजा भागतील व यासाठी त्यांच्या हाताला कांहीतरी काम मिळेल. यासाठी शासनाने प्रयत्न करावेत. यासाठी पांडुरंगाने शासनाला सद्बुध्दी द्यावी हीच आज अपंग दिनाच्या निमित्ताने माझी पांडरंगाच्या चरणावर प्रार्थना आहे.’’ असे मनोगत यावेळी या माऊलीने व्यक्त केले.
यावेळी गणेश अंकुशराव, बाळासाहेब ननवरे, उत्तम परचंडे, राजु कोळी, चंद्रकांत अभंगराव, गणेश तारापूरकर, प्रविण कांबळे, ओंकार परचंडे, पंकज अंकुशराव व महर्षी वाल्मिकी संघाचे कार्यकर्ते व महिला भगिणी मोठया संख्येने उपस्थित होत्या.  





14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *