👁 6 Views

सोलापूर रोड ते अर्बन बँक रस्त्याचे काम लवकर पुर्ण करा! नगरसेवक विक्रम शिरसट यांचेशी चर्चेनंतर मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी ठेकेदारांना दिल्या सुचना!



पंढरपूर Live 4 December 2017

पंढरपूर (प्रतिनिधी):- सोलापूर रोड ते पंढरपूर अर्बन बँक या मार्गाचे करााम चालु असल्याने येथील दुचाकी वाहतुक नागरी वस्ती असलेल्या भागातून वळविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना धुळीचा व वाहतुक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. हा त्रास टाळण्यासाठी या मार्गाचे काम लवकर पुर्ण करावे अशी विनंती मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना केल्यानंतर त्यांनी या मार्गाची पाहणी करुन संबंधीत ठेकेदारास हे काम लवकर पुर्ण करण्याचे आदेश दिले.
 सोलापूर रोड ते पंढरपूर अर्बन बँक या रस्त्याचे काम सध्या सुरु आहे. या कामामुळे  येथील दुचाकींची वाहतुक  नागरिवस्तीच्या भागातून वळविण्यात आली आहे. त्यामुळे गोविंदपूरा, थोरात चौक, कोळे गल्ली, हनुमान मैदान या भागतून मोठ्या प्रमाणात दुचाकी व कांही चार चाकी गाड्यांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांची ही समस्या पाहून नगरसेवक विक्रम शिरसट यांनी मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्याशी या प्रश्‍नाबाबत चर्चा केली. व लवकरात लवकर या मार्गाचे काम पुर्ण होणे अत्यावश्यक असल्याचे निदर्शनास आणून दिले. माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, मुख्याधिकारी अभिजीत बापट, उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर, शहर अभियंता दिनेश शास्त्री, जलशुध्दीकरण केंद्राचे भालेराव आदींसह नगरसेवक विक्रम शिरसट यांनी मार्गाच्या कामाची पाहणी केली. यावेळी समता परिषदेचे अनिल अभंगराव,  कोळी महासंघाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग सावतराव, नंदु पांढरे, भारत माने,  दशरथ माने, धनंजय वाघमारे, विजु अभंगराव, बाळु अधटराव व या मार्गाच्या कामाचे ठेकेदार श्री.देवकर आदी उपस्थित होते. 
नागरी वस्तीच्या भागात होणारी वाहतुक कोंडी कमी होण्यासाठी व त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास रोखण्यासाठी सदर वाहतुक रामबाग, उपजिल्हा रुग्णालय, अनिल नगर ते अर्बन बँक अशी वळविता येण्यासाठी ‘‘सातारकर मठ ते नगरपालिका स्टोअर रुम पर्यंतच्या या मार्गाचे काम तरी येत्या 15 ते 20 दिवसात पुर्ण करावे.’’ अशा सुचना नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजीत वापट यांनी संबंधीत ठेकेदारास केल्या. 





14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *