पंढरपूर Live 6 December 2017
पंढरपूर, दि. 06 :- शासनाच्या आरोग्य विभागामार्फत उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे दिनांक 31 डिसेंबर 2017 पर्यंत राबविण्यात येणा-या मौखिक आरोग्य तपासणी मोहिमेचे उदघाटन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.नंदकुमार घोळवे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी इंडीयन डेंटल असोसिएशनचे पदाधिकारी डॉ. अभिजीत खुपसंगीकर, उपजिल्हा रुग्णालयाचे दंत शल्यचिकित्सक डॉ.प्रसन्न भातलवंडे, डॉ.आशा घोडके, डॉ. विजय वाघ आदी उपस्थित होते.
मोहिमेत 30 वर्षावरील सर्व व्यक्तीनी आपले मौखिक आरोग्य तपासणी करुन मुख कर्करोग शोध, निदान व उपचार मोहिमेत सहभाग घ्यावा तसेच सर्व स्त्री व पुरुष यांनी मौखिक आरोग्याची तपासणी दंतरोग तज्ज्ञांकडून वेळोवेळी करुन घ्यावी असे आवाहनही वैद्यकीय अधिकारी डॉ.घोळवे यांनी केले.
या मोहिमेत 30 वर्षावरील सर्व स्त्री व पुरुष यांची मौखिक आरोग्य तपासणी करण्यात येणार असून, जोखमीच्या रुणांनवर पुढील उपचार करण्यात येणार असल्याची माहिती दंत शल्यचिकित्सक डॉ.भातलवंडे यांनी दिली. तसेच मौखिक आरोग्य, कर्करोगाचे प्रतिबंध, तंबाखूचे दुष्परिणाम व लवकर निदानासाठी तपासणी करण्याबाबतची माहितीही दंतशल्य चिकित्सक डॉ.भातलवंडे यांनी दिली. डॉ.अभिजीत खुपसंगीकर यांनी रुणांनी व कर्मचा-यांनी मौखिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित रुग्णांची व कर्मचारी यांची तपासणी करण्यात आली.
या कार्यक्रमास श्रीमती चौधरी, श्री.विजापुरे, श्री.माशाळकर, श्रीमती ठकार, श्रीमती. एम.एम.कुलकर्णी यांच्यासह रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन पुरषोत्तम कदम यांनी केले.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर







