पंढरपूर Live 6 December 2017
सोलापूर दि.6 :- माजी सैनिकांचे प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कॅम्पचे आयोजन करून हे प्रश्न मार्गी लावले जातील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आज येथे केले.
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,सोलापूर आणि आर्मड फोर्सेस मेडीकल कॉलेज, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सैनिकी मुलांचे वसतीगृह येथे माजी सैनिक व अवलंबितासाठी दंत चिकित्सा व तोंडाचे विकार तपासणीसाठी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
समारंभास एएफएमसी पुणेचे ब्रिगेडिअर डॉ. एस.के.रॉय चौधरी, मेजर खांडेकर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन सुनिल गोडबोले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ.राजेश चौगले, दंत महाविद्यालयाचे डॉ.कुंभार यांच्यासह माजी सैनिक व त्यांचे कुटूंबिय उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, माजी सैनिकांच्या समस्या सोडवण्यास जिल्हा प्रशासन नेहमीच कार्यरत असते. माजी सैनिकांच्या जमिनीबाबत प्रलंबित असणारी प्रकरणे निकाली काढली जातील. शासकीय सेवेत कार्यरत असतांना वैद्यकीय सुविधा मिळतात. पण सेवानिवृत्ती नंतरही वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यारा सैनिक कल्याण विभाग आहे. सध्याच्या धावपळीच्या युगात आरोग्याकडे सर्वांनी लक्ष देणे जरूरीचे आहे. प्रत्येक आजारावर उपचार असल्याने कोणीही याबाबत घाबरू नये. सैनिक कल्याण विभागाकडील काही आरोग्य सेवा मोफत तर काही सेवा कमी खर्चात उपलब्ध होत असतात, याचा लाभ संबंधित माजी सैनिक व अवलंबितांनी घ्यावा.”
ब्रिगेडीअर एस.के.रॉय चौधरी यांनी दंत चिकित्सा, तोंडाचे विकार या बाबत मार्गदर्शन केले. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन गोडबोले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रमेश राजिगरे यांनी संयोजन केले.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर






