👁 4 Views

अनिल बारसकर व ज्योती पाटील यांचा सन्मान



पंढरपूर Live 7 December 2017


जिल्ह्यात शौचालय कामाचे उद्दिष्ट साध्य करणारे वैरागचे ग्रामविकास अधिखारी अनिल बारसकर व ग्रामसेविका ज्योती पाटील यांचा मुंबईत स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री बबन लोणीकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

शौचालयाचे बांधकाम उद्दिष्ट पुर्ण करुन सर्वसामान्य जनतेस शौचालय बांधून त्यचा वापर करण्यासाठी जनतेचे मनपरिवर्तन करण्याचे महत्वपुर्ण काम बारसकर आणि पाटील यांनी जिल्ह्यातील 11 तालुक्यांमधील गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, सरपंच, सदस्य आदींना गावात शंभर टक्के शौचालय बांधून त्याचा वापर करण्यासाठी मोहीम राबविली होती. 

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी ही मोहीम जिल्ह्यात राबविली. गावोगावी शौचालय बांधून त्याचा वापर करण्याचे उद्दिष्ट वैराग ग्रामपंचायतीने स्वीकारले. 3 हजार 124 एकुण कुटूंबसंख्या असलेल्या कुटूंबात 820 शौचालय बांधून वापर करण्याचे उद्दिष्ट पुर्ण केले. बेसलाईन सर्व्हेनुसार 2017-18 या सालासाठी 820 शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट मुदतीत पुर्ण केले. या कामाची पाहणी मंत्रालय स्वच्छता कमिटीने करीत अहवाल सादर केला होता. त्यामुळे वैराग ग्रामपंचायतीने आजपर्यंत एकुण 3 हजार 124 शौचालयर बांधकाम पुर्ण करुन तचा नियमित वापर केला आहे.

मुंबईत घेतलेल्या कार्यक्रमास जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय लोंढे, अक्कलकोट गटविकास अधिकारी महादेव बेळ्ळे, प्रशांत मरोड, जिल्हा स्वच्छता अभियानाचे संवाददाता सचिन जाधव, गेामपंचायत अभियंता रामभाऊ जाधव, कार्यालय अधीक्षक विलास मस्के, लिपिक अमजद शेख आदी उपस्थित होते.  






14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *