परळी : ट्रक खरेदी व्यवहारात सात लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सपना कल्पेश बियाणी यांच्या मालकीच्या ट्रकचा विक्री व्यवहार फेब्रुवारी २०१४ मध्ये आरोपी सय्यद शारुख सय्यद खदीर वय २२ वर्षे रा. चौजगल्ली बालेपीरनगर, बीड याच्याशी झाला होता. हा व्यवहार होत असताना या ट्रकवर श्रीराम फायनान्स गुलबर्गा यांचे असलेल्या कर्जाचे ४४ हप्ते खरेदीदार आरोपी सय्यद शारुख सय्यद खदीर यांनी भरण्याचे लेखी खरेदी खत करण्यात आले. असे असताना आरोपीने आजपावेतो हे हप्ते भरलेच नाहीत. त्यामुळे या आरोपीने या व्यवहारात सात लाख एकोनव्वद हजार सहाशे रुपयांची फसवणूक केली. अशा अशयाच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात कलम ४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकाॅ लांडगे हे करीत आहेत.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर







