पंढरपूर Live 12 December 2017
विद्यार्थी व पालकांच्या समस्या सोडविण्यासाठी सरसावली
महर्षी वाल्मिकी विदयार्थी आघाडी..!
पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूर शहर व तालुक्यातील विविध खाजगी शैक्षणीक संस्था व कोचिंग क्लासेस कडून पालकांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवण्याबाबत व विद्यार्थ्यांच्या इतर प्रश्नासंदर्भात महर्षी वाल्मिकी विद्यार्थी आघाडी सरसावली आहे. यासंदर्भात लक्ष घालून विविध खाजगी शैक्षणिक संस्था व कोचिंग क्लासेसची चौकशी करण्याची मागणी संघटनेेच्या वतीने पंढरपूर प्रांताधिकार्यांना निवेदन देऊन केली असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष महावीर संजय अभंगराव यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
गेल्या अनेक वर्षापासून पंढरीतील विविध शैक्षणिक संस्था व खाजगी कोचिंग क्लासेस मधून ‘अव्वाच्या सव्वा’ फी आकारुन पालकांची आर्थिक पिळवणूक सर्रासपणे होत आहे. नियमबाह्य मनमानी पध्दतीने फी आकारुन शिक्षणाचे बाजारीकरण चाललेले आहे. याचबरोबर अशा खाजगी शालेय संस्था व कोचिंग क्लासेस मध्ये जे शिक्षक भरती केले जातात त्यांची शैक्षणीक पात्रता (पदवी) सुध्दा तपासणे आवश्यक आहे. तपासाअंती आपणास अर्धवट शिक्षण घेतलेले शिक्षक अनेक शैक्षणीक संस्थेत व कोचिंग क्लासेस मध्ये आढळून येतील. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊन शैक्षणीक गुणवत्तेचा दर्जा घसरत आहे. अनेक खाजगी शैक्षणिक संस्था व कोचिंग क्लासेस वाल्यांनी फक्त बड्या बड्या बिल्डींगस् व इतर भपकेबाजपणा दाखवत आमची संस्था खुप उच्च दर्जाचे शिक्षण देते. अशी जाहिरातबाजी करत पालकांना व विद्यार्थ्यांना आकर्षीत करुन घेतात. परंतु मुळ उद्देश जो शिक्षण देण्याचा असतो त्याबाबतीत उदासिनता आढळून येते. यामुळे सर्वसामान्य पालक भरडला जात आहे आणि विद्यार्थी खर्या उच्च दर्जाच्या शिक्षण सुविधापासून वंचीत राहिला जात आहे. आपण याबाबतीत अशा खाजगी संस्थांची वेळीच तपासणी करुन हे शिक्षणाचे बाजारीकरण थांबवणं अत्यावश्यक आहे.
याचबरोबर नगरपरिषदेच्या शाळा व इतर अनेक शैक्षणीक संस्था परिसरात सर्व घाणीचे साम्राज्य पसरलेले आढळून येत आहे. त्यामुळे विद्यार्थी आजारी पडण्याच्या घटना वाढलेल्या आहेत. येथील स्वच्छता वेळीच होणं आवश्यक आहे. अनेक शैक्षणिक संस्था व कोचिंग क्लासेस समोर रोडरोमिओंचा वावर वाढलेला आहे. त्यामुळे विद्यार्थिनींचे विनयभंग होण्याचे प्रकारही सातत्याने वाढत आहेत. पंढरपूर शहर व परिसरात अनेक खाजगी निवासी शाळा व उच्चशिक्षण देणारी महाविद्यालय निर्माण झाली आहेत. या निवासी संस्थांमधून विद्यार्थ्यांना अमुक प्रकारचे भोजन वगैरे दिले जाते असे जाहिरातीमध्ये सांगितले जाते परंतु प्रत्यक्षात मात्र तशी भोजन व्यवस्था आढळून येत नाही. अशा निवासी खाजगी संस्थांची व संस्थाचालकांचीही चौकशी होऊन सत्य काय ते आपण उजेडात आणणे अपेक्षीत आहे.
वरील सर्व प्रश्न सोडविण्यासाठी तत्परतेने कठोर पावले उचलून चौकशी करावी, गेल्या अनेक वर्षापासूनचे हे प्रलंबीत प्रश्न त्वरीत सोडविले गेले नाहीत तर आम्हा महर्षी वाल्मिकी संघ विद्यार्थी आघाडीला तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल. अशी मागणी व इशारा या निवेदनाद्वारे दिला गेला आहे.
प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन देताना महर्षी वाल्मिकी संघ विदयार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष महावीर संजय अभंगराव, महेश महेर, निलेश भोपळे, सुरज राठी, विठ्ठल अधटराव, रोहीत अधटराव, पोपट कोळी, नाना कोळी आदी उपस्थित होते.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर








