👁 5 Views

प्रेमविवाहनंतर चारित्र्यावर संशय, पतीन ब्लॉक केल्यानं पत्नीन संपवलं जीवन

 

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने संशय घेत मोबाईल नंबर ब्लॉक केल्याने एका विवाहितेने गळफास घेऊन आपली जीवयात्रा संपवली आहे.


याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पुण्यातील कात्रज परिसरात ही घटना घडली आहे. समीक्षा (वय २२ वर्ष) असं मृत्युमुखी पडलेल्या विवाहितेचं नाव असून याप्रकरणी पोलिसांनी अविनाश (रा. पांढरकवडा, जि. यवतमाळ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश आणि समीक्षा हे दोघे मूळचे यवतमाळ येथील आहेत. त्यांचे एकमेकांवर प्रेम असल्यामुळे त्यांनी घरी न सांगता प्रेमविवाह केला. समीक्षा ही शिक्षणासाठी पुण्यात राहत होती.

लग्नानंतर काही दिवसांनीच पती अविनाश हा पत्नी समीक्षाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. समीक्षा दुसऱ्या मुलासोबत बोलत असल्याचा संशय घेऊन तो तिला मारहाण करीत होता. यामुळे समीक्षा कायम दु:खी असायची.


दरम्यान, अविनाशने पत्नी समीक्षाला मानसिक त्रास देऊन तिचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केला. त्यामुळे यामुळे समीक्षाला प्रचंड मनस्ताप झाला आणि तिने राहत्या घरी पंख्याला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *