पंढरपूर Live 13 December 2017
निलेश चाळक बीड -गेल्या दोन महिन्यापासून जिल्ह्यात विविध ठिकाणी सेक्स अड्ड्यावर धाडी टाकल्या जात आहे. बीड शहरात पुन्हा एकदा सेक्स रॅकेट उघडकीस आले असून धानोरा रोड परिसात एका घरात वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलीसांना झाल्यानंतर रात्री ९.३० च्या दरम्यान या ठिकाणी धाड टाकून चार पुरूष व दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले.
या तील एक महिला मुंबई येथील आहे तर एक बीडची असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली. एक महिन्यापूर्वी शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सेक्स अड्ड्यावर धाड टाकण्यात आली होती. धानोरा रोड परिसरात एका घरात वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती शिवाजीनगर पोलीसांना झाल्यानंतर पोलीसांनी सापळा रचून रात्री ९.३० वाजता त्याठिकाणी धाड टाकली असता त्यावेळी दोन महिला व चार पुरूष आढळून आले. या प्रकरणी गोरे अतूल, रामा लांडगे, संतोष भालेराव, उमेश आनेराव यांच्यासह दोन महिला अशा सहा जणांवर शिवाजीनगर पोलीसात गुन्हे दाखल करण्यात आले. ही कारवाई पीएसआय दिपाली गिते मॅडम शिवाजी नगर ठाण्याचे नानासाहेब लाखाळ यांच्यासह कर्मचार्याने केली. यातील एक महिला मुुंबई येथील तर एक महिला बीड येथील असल्याची माहिती पोलीसांनी सांगितले.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर








