👁 9 Views

सरकारी नोकरीच्या आमिषाने 11 लाखांचा गंडा

 

साताऱयातील तरुणांना वन विभागात नोकरी लावतो म्हणून 11 लाख रुपयांची फसवणूक करणाऱयाला बोरगाव पोलिसांनी त्याच्या घरातून ताब्यात घेतले. राजेश नंदकुमार शिंदे (रा.


बोरगाव, ता. सातारा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. गणेश कृष्णा चव्हाण (वय 29, रा. सदरबझार, सातारा) यांनी फिर्याद दिली.


चव्हाण यांना कराड येथे वनपाल म्हणून नोकरीला लावतो, असे आमिष दाखवून त्यांच्याकडून राजेश नंदकुमार शिंदे याने साडेतीन लाख रुपये घेतले. गणेश चव्हाण यांच्याप्रमाणेच इतर चार तरुणांनाही अशाच पद्धतीने आमिष दाखवून त्यांच्याकडून शिंदे याने पैसे उकळले. या पाच तरुणांची एकूण 11 लाखांची फसवणूक झाली होती. हा प्रकार दीड वर्षापूर्वी घडला होता.


संबंधित तरुणांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात याविषयी तक्रार दिली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर राजेश शिंदे हा फरार झाला होता. त्यानंतर बोरगाव पोलिसांनी राजेश शिंदे याला त्याच्या घरातून ताब्यात घेतले. बोरगाव पोलिसांनी त्याला शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *