पंढरपूर Live 16 December 2017
सोलापूर दि. 16 :- सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका निपक्ष आणि निर्भय वातावरणात होण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशा सूचना राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी आज येथे दिल्या.
सोलापूर जिल्ह्यात जानेवारी आणि फेब्रुवारी 2018 मध्ये मुदत संपणा-या ग्रामपंचायतीसाठी येत्या 26 डिसेंबर 2017 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी श्री. सहारिया यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलीस आयुक्त महादेव तांबडे- पाटील, पोलीस अधीक्षक एस.वीरेश प्रभु, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, अतिरिक्त पोलीस अधीक्षक निखील पिगळे , अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, उपजिल्हाधिकारी रेश्मा माळी आदी उपस्थित होते.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, ग्रामपंचायतीसाठी होणा-या निवडणुकांत आपण नवनवीन प्रयोग करीत आहे. या प्रयोगांना यश येत आहे. या प्रयोगामुळे निवडणूक प्रक्रिया अधिक सुटसुटीत आणि सोपी होणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर निवडणूक लढवणा-या उमेदवारालाही त्याचा त्रास होणार नाही याचा विचार केला आहे.
64 ग्रामपंचायतीसाठी होणा-या निवडणुका मुक्त आणि निर्भय वातावरणात होण्यासाठी विविध पथकांनी चोख काम करायला हवे. या पथकांना निवडणूक आयोगांच्या सूचनाप्रमाणे कामकाज करता यावे यासाठी आवश्यक सोयी सुविधा पुरवा. अशा सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी श्री. सहारिया यांनी निवडणुक प्रक्रिया सोपी, सुटसुटीत, पारदर्शक कशी करता येईल आणि आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी कशी करता येईल या मुद्दयावर सर्व अधिका-यांशी अनौपचारिक चर्चा केली.
यावेळी उपविभागीय अधिकारी विजय देशमुख, ज्येाती पाटील, स्नेहा उबाळे, पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी, तहसिलदार संजय पवार, ऋषिकेश शेळके, हनुमंत कोळेकर, दीपक वजाळे आदी उपस्थित होते
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर






