पंढरपूर Live 20 December 2017
महाराष्ट्र शासनाने पंढरपूर शहराच्या विकासासाठी व येणा-या भाविकांना चांगल्या सेवा सुविधा मिळाव्यात म्हणुन मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिलेला आहे. या निधीमधुन शहरामध्ये विविध रस्त्यांची डांबरीकरण व कॉंक्रीटीकरणाची कामे चालु आहेत. यामध्ये पर्यटक निवास ते मध्यप्रदेश भवन येथील रस्त्याचे काम चालु असुन या रस्त्या लगत अॅड.एम.टी.नागणे यांची मालमत्ता असुन त्यांनी या कामामध्ये आपले बाधीत होणारे वॉलकंपाऊंडची भिंत पाडु नये अशा आशयाचा दावा पंढरपूर येथील सिव्हील जज्ज सिनिअर डिव्हीजन श्री.सासणे साहेब यांचे कोर्टात रे.मु.नं.५७/२०१७ ने दाखल केला होता. या दाव्यामध्ये शासन व पंढरपूर नगरपरिषदे विरुद्ध अंतरीम तुर्तातुर्त ताकीद मिळाली होती. त्यामुळे सदरचा दावा प्रलंबीत असल्यामुळे रस्त्याच्या कामामध्ये अडथळा निर्माण झाला होता. या दाव्यामध्ये सरकार तर्फे अॅड. सारंग वांगीकर व नगरपरिषदेतर्फे अॅड.डी.जे.भोसले यांनी युक्तीवाद केला होता. दोन्ही बाजुंनी युक्तीवाद होवुन प्रकरण बरेच ताणले गेले होते. अशा परिस्थितीत सदरचा दावा सिनिअर डिव्हीजन कोर्टासमोर चालु असताना सुद्धा पंढरपूर शहराच्या विकासाच्या दृष्टीने स्वत: जिल्हा न्यायाधीश श्री.पी.आर. देशमुख साहेब यांनी मध्यस्थी करुन सदरच्या दाव्यामध्ये तडजोड घडवुन आणली. केवळ मध्यस्थीने या दाव्यात तडजोड न करता स्वत: जातीने दावा मिळकतीमध्ये हजर राहुन वादग्रस्त वॉलकंपाऊंड समक्ष जी.सी.पी.द्वारे पाडुन घेतली.
त्यामुळे केवळ जिल्हा न्यायाधीश यांच्यामुळेच या रस्ता रुंदीकरणाच्या कामामधील महत्वाचा अडथळा दुर झाला आहे. जर जिल्हा न्यायाधीशांनी एखादी गोष्ट मनावर घेतली असता काय बदल घडु शकतो याचे उत्तम उदाहरण असल्याचे नगराध्यक्षा साधनाताई नागेश भोसले यांनी सांगितले. अशा प्रकारे सार्वजनिक हिताच्या कामामध्ये न्यायालयाचे सहकार्य राहिल्यास निश्चितपणाने शहराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही असे मत व्यक्त केले. तसेच अॅड.एम.टी.नागणे यांनी मा.जिल्हा न्यायाधीश यांच्या शब्दाला मान देवुन शहराचा विकास होण्यासाठी पंढरपूर नगरपरिषदेस सहकार्य केले त्याबद्दलही अॅड.नागणे यांचे आभार व्यक्त केले. या बाबीमुळे मा.जिल्हा न्यायाधीश यांनी पंढरपूर करांना जणु काही असा संदेशच दिला आहे की, शासना मार्फत राबविण्यात येणा-या विविध विकास कामे व रस्ता रुंदीचे कामामध्ये नगरपरिषदेस सहकार्य करावे व शहराच्या विकासास गतीमान करावे. या दाव्याबाबत मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी नगरपरिषदेतर्फे वारंवार पाठपुरावा केला होता. सदर बाधीत मिळकत पाडताना जिल्हा न्यायाधीश श्री.पी.आर.देशमुख साहेब, सरकारी वकील अॅड.सारंग वांगीकर, वादी अॅड.एम.टी.नागणे व त्यांचे वकील अॅड.एम.एस.नाईकनवरे, नगरपरिषदेचे अॅड.डी.जे भोसले, नगरसेवक अॅड.गुरुदास अभ्यंकर, अॅड.एस.आर.कुलकर्णी, नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर, मुख्य नगर अभियंता दिनेश शास्त्री, शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे हे सर्व उपस्थित होते.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर





