पंढरपूर Live 20 December 2017
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी तालुक्यातील मौजे नागपिंप्री येथे श्री नागनाथाच्या यात्रे निमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गुणवंत विद्यार्थ्यांच्या स्तकार व बक्षिस वितरणाच्या कार्यक्रमाचे नागनाथ प्रतिष्ठानच्या आयोजन करण्यात आले होते. गुणवंत विद्यार्थ्यांचे कार्यक्रमाचे प्रमुख राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांच्या हस्ते बक्षीसाचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मोहाचे सरपंच काँ.अजय बुरांडे यांची उपस्थित होते.
डॉ.संतोष मुंडे म्हणाले की, ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांमध्ये सुध्दा भरपूर गुणवत्ता, टँलेंट, जिद्द आणि चिकाटी, कष्ट करण्याची तयारी व आत्मविश्वास असतो, पालकांनी देखील विद्यार्थ्यां वर जोर टाकु नये त्यांना आपल्या कलेप्रमाणे,आपले करिअर घडवू घावे, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये देखील उच्चे ध्येय गाठण्याची क्षमता असे त्यांनी सांगितले. यावेळी मोह्याचे सरपंच काँ.अजय बुरांडे यांनी देखील उपस्थित विद्यार्थ्यांना मोलाचे असे मार्गदर्शन केले.तसेच मान्यवरांचे हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास सरपंच यशवंत भोसले,उपसरपंच बालासाहेब मुंडे, डाँ.भोसले, शिवशंकर भोसले, रघुनाथ मुंडे, श्रींमत मुंडे, परमेश्वर भोसले, पंडीत भोसले, पो.पाटील श्रीराम भोसले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गावकरी मंडळी उपस्थित होते.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर





