👁 7 Views

जीवनात चांगले फळ मिळण्याकरिता परमार्थाची जोड आवश्यक- भरत महाराज जोगी


पंढरपूर Live 22 December 2017
परळी वै.-  प्रत्येकाचे कर्म हे वेगवेगळ्या प्रकारचे असून  हातून ते-ते होत असते. जन्माला आल्यानंतर कर्म करत असताना जीवनात चांगले फळ मिळण्यासाठी त्याला परमार्थाची जोड असणे गरजेचे आहे असे प्रतिपादन श्री काळभैरव संस्थानचे अध्यक्ष भरत महाराज जोगी यांनी मौजे मिरवट येेथे बुधवार दि. 20 डिसेंबर रोजी केले.

‘काहूर’चे संपादक शंकर इंगळे यांच्या मातोश्री कै. सौ. रुक्मीनबाई  वामनराव इंगळे यांच्या गोड जेवणानिमित्त ‘तुम्ही सांभाळीले संती, भय निरसली खंती’ या संत तुकोबाराय यांच्या अभंगावर कीर्तन प्रसंगी जोगी महाराज पुढे म्हणाले, मागच्या जन्माचं कर्म भोगण्यासाठी  कर्म, वासना, पाप-पुण्य या तीन गोष्टी कारणीभूत असून माणसाला जन्माला आल्यानंतर वासना सोबतच पाप-पुण्यही ज्याच्या-त्याच्या हातून होत असते. पाप-पुण्य हे संमिश्र झाल्यानंतर मनुष्य जन्म मिळत असतो.

माता-पित्याला विसरु नका

‘नजरेला लावी पाप त्याला नेत्र म्हणू नये, विसरला आई-बाप त्याला पूत्र म्हणू नये’ आई-बाप यांना जापे विसरतो त्याला पूत्र म्हणून घेण्याचा काही अधिकार नसतो. आपल्या आई-वडिलाची सेवा करावी. प्रत्येक पूत्राने आपली संस्कृती आणि संस्कार जोपासणे ही सर्वात मोठी संपत्ती आहे असा उपदेशही भरत महाराज जोगी यांनी यावेळी केला.

याप्रसंगी सर्वश्री रामेश्वर महाराज कोकाटे, नायब तहसिलदार महादेव सुरवसे, विश्वास महाराज पांडे, तुळसीराम पवार, संजय खाकरे,  राम महाराज भदाडे, मृदंगाचार्य अशोक महाराज कराळे, पौळ महाराज फळेकर, सत्यनारायण शेंडगेकर, सखाराम पोहंडूळकर, माधवराव सानप, तुकाराम मस्के, हनुमंत अप्पा पोखरकर, सुदामराव मस्के, चरणराव साठे, रतन इंगळे, तुळसीदास इंगळे, लक्ष्मणराव पाटील इंगळे, राघोबा इंगळे, यादव माने, विश्वनाथ इंगळे,  लक्ष्मण पवार, संजय इंगळे, नागोराव पवार यांच्या सह महिला, परिसरातील भाविकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती.


14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *