पंढरपूर Live 22 December 2017
पंढरपूर- येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय, पंढरपूर व सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वेरीच्या सिव्हिल इंजिनीअरिंग विभागात दि १८ ते २२ डिसेंबर या कालावधीत ‘युटीलायजिशन ऑफ सायंटीफीक टेक्निक्स ऑफ वॉटर रिसोर्स इंजिनीअरिंग टू जलयुक्त शिवार अभियान’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले होते.
पाटबंधारे विभागाचे माजी सचिव प्रभाकर भालेराव यांच्या हस्ते कार्यशाळेचे उदघाटन झाले. यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, ‘शेतकऱ्यांसमवेत संपर्क वाढवून त्यांना पाण्याचे महत्व व त्याचे जतन करावे असे सुचविले.दुसऱ्या सत्रात डॉ. एम.डी.पाटील यांनी ‘महाराष्ट्रातील नदी जोड प्रकल्प व त्याचे विशेष महत्व’ याचा सविस्तरपणे आढावा घेतला. देशासाठी सदर प्रकल्प तातडीने हातात घेन्याबाबत देखील त्यांनी सुचविले. त्यानंतर रवींद्र पाठक यांनी ‘अस्तित्वात असणाऱ्या पाझर तलावातील साठा कुपनलिका मार्फत जमिनीमध्ये जतन करणे क्रमप्राप्त आहे’ असे सांगितले. तसेच त्यांनी पाणी साठ्यावरील बाष्पीभवन कमी करण्याबाबत विविध उपाय सांगितले. त्यानंतर राज्याचे जलसंधारण महामंडळाचे उपसचिव अभियंता रवींद्र पवार यांनी जलयुक्त शिवार अभियान करीता विविध पाणी साठे व त्याची तांत्रिक संरचना करण्यासाठी प्रेरित केले. तसेच दीर्घकालीन टिकणारे, कमी खर्चाचे पाणी साठे करणारी बांधकामे ‘फेरोसिमेंट’ चा वापर करण्याबाबत प्रशिक्षित केले. अंतिम सत्रात सिव्हिल इंजिनीअरिंग विभागप्रमुख डॉ. एन.व्ही खडके यांनी या कार्यशाळेद्वारे शिक्षक व त्यांच्या विद्यार्थ्यांनी ‘शेतकऱ्यांना पावसाचा प्रत्येक थेंब माझा असून माझ्याच शेतात अडविला पाहिजे’ याची जाणीव करून देणे गरजेचे आहे.’ अशी अपेक्षा व्यक्त केली. अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांनी या कार्यशाळेत संशोधनावर आधारित पाण्याचे महत्व विशद केले. सादर प्रशिक्षणास पाटबंधारे विभाग विविध अभियांत्रिकी महाविद्यालये तसेच इतर ठिकाणाहून ५० हून अधिक प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शिवानंद माळी यांनी केले तर आभार प्रा. व्ही.एस.क्षीरसागर यांनी मानले. यावेळी प्रा. एस. बी.पाटील, प्रा.ए.टी. बाबर,स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, डिप्लोमाचे प्राचार्य प्रा.एन.डी. मिसाळ, प्रा.एस.व्ही. क्षीरसागर तसेच सिव्हील विभागातील प्राध्यापकवर्ग उपस्थित होते.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर





