पंढरपूर Live 22 December 2017
युटोपियन शुगर्स आयोजित राज्य-स्तरीय आट्या-पाट्या स्पर्धेत महिला गटातून उस्मानाबाद तर पुरूष गटातून वाशिम संघ अव्वल.
पारंपरिक मातीशी नाळ जोडलेला हा खेळ प्राचीन काळापासूनचा खेळ आहे.काळाच्या ओघामध्ये हा खेळ मागे पडला त्यास पुनश्च गतवैभव मिळावे, या साठी युटोपियन शुगर्स ने मागील काही वर्षापासून महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे.आमदार परिचारक यांच्या सहकार्याने या खेळास न्याय मिळवून देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन सोलापूर जि.प.अध्यक्ष संजय मामा शिंदे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य आट्या-पाट्या महामंडळ व सोलापूर जिल्हा आट्या-पाट्या असोसिएशन आयोजित, व युटोपियन शुगर्स प्रायोजित ३२ वी पुरुष व २८ महिला सीनियर राज्य-स्तरीय आट्या-पाट्या अजिंक्यपद स्पर्धा २०१७ -१८ च्या पारितोषिक वितरण प्रसंगी शिंदे बोलत होते.या प्रसंगी सांगोला तालुक्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील, बार्शी तालुक्याचे माजी आमदार राजाभाऊ राऊत, सोलापूर जिल्हामध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश हसापुरे, माळशिरस ता.पं.स.माजी उप सभापती उत्तमराव जानकर, जि.प.बांधकाम व अर्थ समितीचे सभापती विजयराज डोंगरे, भाजपाचे सांगोला तालुक्याचे अध्यक्ष श्रीकांत देशमुख, कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील महाराष्ट्र राज्य आट्या-पाट्या महामंडळाचे सचिव डॉ.दीपक कवीश्वर, आट्या-पाट्या ऑल इंडिया फेडरेशन चे अशोक पाटील, त्याच बरोबर सो.जि. आट्या-पाट्या फेडरेशन चे अध्यक्ष बाबासो कापसे,शिवाजीराव नागणे. आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, आट्या-पाट्या खेळास पूर्वी ०५% आरक्षण देण्यात येत होते. याचा महाराष्ट्रातील व जिल्ह्यातील अनेक खेळाडूंना लाभ ही झालेला आहे.मात्र,अलीकडील काळामध्ये शासनाने या खेळाचे आरक्षण बंद केले.त्यामुळे भविष्यात हा खेळ संपतो की काय? असे वाटत असतानाच युटोपियन शुगर्स प्रशासनाने मागील काही वर्षापासून आट्या-पाट्या खेळास उर्जितावस्था मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो निश्चितच कौतुकास्पद आहे.या खेळाला आमदार परिचारक व आमदार बबनदादा शिंदे यांच्या मदतीने आरक्षण मिळवून देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
स्वागत व प्रास्ताविक करताना युटोपियन शुगर्स चे चेअरमन उमेश परिचारक म्हणाले की,जिल्ह्याचे आमदार प्रशांतरावजी परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त पारंपरिक खेळ म्हणून गणला जाणारा,व ग्रामीण भागातील अतिशय लोकप्रिय खेळ असल्याने त्यास पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून,कुस्त्यांची राजधानी म्हणून जसे कोल्हापूर जिल्ह्याचा ज्या प्रमाणे उल्लेख होतो,त्याच प्रमाणे आट्या-पाट्या ची राजधानी म्हणून सोलापूर जिल्ह्याचा विशेषत: मंगळवेढा तालुक्याचा उल्लेख व्हावा या साठी मागील काही वर्षांपासून आम्ही प्रयत्नशील आहोत. दरवर्षी या ठिकाणी आट्या-पाट्यासामने आयोजित करीत आहोत.चालू वर्षी सोलापूर व उस्मानाबाद येथील आट्या-पाट्या संघाने हजेरी लावली त्या वेळेस जिल्हा आट्या-पाट्या असोसिएशन चे अध्यक्ष बाबासाहेब कापसे यांच्या विनंती नुसार त्यांना राज्यस्तरीय आट्या-पाट्या सामने आयोजित करण्याचा शब्द दिला होता त्याची आज पूर्तता झालेली आहे. भविष्यात ही आट्या-पाट्या च्या वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे मत परिचारक यांनी व्यक्त केले.
यावेळी शहाजीबापू पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना परिचारक यांनी आट्या-पाट्या साठी दिलेले योगदान महत्वाचे असल्याचे मत व्यक्त करीत परिचारकांनी भविष्यात विविध राजकीय कोंडी फोडण्यासाठी प्रयत्नशील रहावे,अशी टिप्पणी केली.व विजयी संघास शुभेच्छा दिल्या.हरणारा होता म्हणून जिंकणार्याला किंमत असते. जिंकणार्यासंघाचे अभिनंदन व हरणार्या संघास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.तसेच युटोपियन शुगर्स च्या योग्य नियोजना बद्दल कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील यांचे आभार मानले. या स्पर्धेतील विजेते संघ पुढील प्रमाणे महिला विजेता आट्या-पाट्या संघ
प्रथम क्रमांक. उस्मानाबाद जिल्हा आट्या-पाट्या असोसिएशन.
व्दितीय क्रमांक.भंडारा जिल्हा आट्या-पाट्या असोसिएशन.
तृतीयक्रमांक. नागपूर व चंद्रपुर जिल्हा आट्या-पाट्या असोसिएशन.
तसेच पुरुष विजेता आट्या-पाट्या संघ. पुढीलप्रमाणे.
प्रथम क्रमांक.वाशिम जिल्हा आट्या-पाट्या असोसिएशन.
व्दितीय क्रमांक.उस्मानाबाद जिल्हाआट्या-पाट्या असोसिएशन.
तृतीयक्रमांक. जळगाव व भंडारा जिल्हा आट्या-पाट्या असोसिएशन.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी अजिंक्य क्रीडा मंडळाचे प्रशिक्षक सुभाष मस्के, गजेंद्र पवार,नागनाथ क्षीरसागर,दत्तू सर आदींनी परिश्रम घेतले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण पांढरे यांनी केले.
फोटो ओळी
सदर प्रसंगी विजयी संघासमवेत सांगोला युटोपीयन शुगर्स चे चेअरमन उमेश परिचारक तालुक्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील, बार्शी तालुक्याचे माजी आमदार राजाभाऊ राऊत, सोलापूर जिल्हामध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश हसापुरे, माळशिरस ता.पं.स.माजी उप सभापती उत्तमराव जानकर, जि.प.बांधकाम व अर्थ समितीचे सभापती विजयराज डोंगरे, भाजपाचे सांगोला तालुक्याचे अध्यक्ष श्रीकांत देशमुख, कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील महाराष्ट्र राज्य आट्या-पाट्या महामंडळाचे सचिव डॉ.दीपक कवीश्वर, आट्या-पाट्या ऑल इंडिया फेडरेशन चे अशोक पाटील, त्याच बरोबर सो.जि. आट्या-पाट्या फेडरेशन चे अध्यक्ष बाबासो कापसे,शिवाजीराव नागणे. आदि दिसत आहेत
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




