👁 7 Views

राष्ट्रवादीत ?आणि मी? प्रश्नच उद्भवत नाही..! मी भाजपातच – एकनाथ खडसे

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

पंढरपूर Live 28 December 2017


राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांचा दावा; भाजपाकडून मात्र नकार, खडसे यांनीही फेटाळला दावा

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – गेले काही महिन्यांपासून नाराज भाजपा ज्येष्ठ नेते, माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाणार याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली होती, मात्र त्याला खुद्द खडसे यांनीच मी दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे स्पष्टीकरण करून या चर्चेला पूर्ण विराम दिला. राष्ट्रवादीची ही जुनीच खेळी असून, एकनाथ खडसे भाजप सोडणार नसल्याचे भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी सांगितले.

जळगावमध्ये राष्ट्रवादीचे नेते आ. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा मेळावा होणार आहे. यावेळी अनेक नेते आणि कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपा आणि शिवसेनेमध्ये गेलेले अनेक नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्याबाबत अनेक जण पक्ष नेतृत्वाशी चर्चा करत आहेत अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली. तसेच राजकारणात कुणीही कायमचा शत्रू नसतो असे म्हणत एकनाथ खडसेंच्या प्रवेशाबाबत संकेत राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते मलिक यांनी दिल्याने नाराज असलेले एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा राजकिय वर्तुळात सुरू आहे. पक्षातून २०१४ मध्ये मोठ्या प्रमाणात आमदार आणि नेते भारतीय जनता पक्षात गेले आहेत. बदलत्या राजकीय समीकरणामुळे हे गयाराम आता आयाराम होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस जळगावमध्ये मेळावा घेणार असून त्यात भाजपाचे मोठे नेते पक्षप्रवेश करतील याबाबत एकनाथराव खडसे यांनी मात्र काहीही मत व्यक्त करण्यास नकार दिला असला तरी त्यांच्या कार्यकर्त्यांचा त्यांच्यावर भाजपा सोडण्यासाठी दबाव असल्याचे मलिक यांनी सांगितले. खडसे यांच्यासारखे मोठे नेते पक्षात येत असतील तर त्यांचे स्वागतच आहे असेही मलिक यावेळी म्हणाले. याविषयी खडसे यांच्याशी संपर्क केला असता दुसऱ्या पक्षात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी पक्ष सोडणार नाही अशा शब्दात मलिक यांचा दावा आमच्या प्रतिनिधीशी  बोलताना फेटाळून लावला आहे. भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणामुळे खडसे यांना महसूल मंत्रिपदावरून खडसे यांना पायउतार व्हावे लागले होते. नुकतेच हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांच्यावरील चौकशी समिती असलेल्या झोटिंग समितीचा अहवाल निरर्थक म्हटल्याने खडसेंची घरवापसी लांबणीवर गेली आहे. दरम्यान अधिवेशनात देखील काँग्रेसकडून खडसे यांना पक्षप्रवेशाच्या ऑफर आल्या होत्या. राजकारणात कुणी कायमचा शत्रू नसतो असे मलिक यांनी म्हणत खडसेंच्या प्रवेशाबाबत संकेत दिले. अजित पवार यांच्यासह खडसे आणि माजी मंत्री सुरेशदादा जैन जळगावात एकाच मंचावर येणार असल्याचे देखील मलिक यांनी सांगितले.



=====================


14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *