👁 12 Views

जिद्दीने काम करणारे युवक प्रणव परिचारक -आमदार दत्तात्रय सावंत

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 


पंढरपूर Live 29 December 2017

वाढदिवसानिमित्त प्रणव परिचारक यांचा भव्य नागरी सत्कार

खर्डी (अमोल कुलकर्णी):- गावासाठी,जिल्ह्यासाठी प्रणव परिचारक नेहमीच स्वतः लक्ष घालून मुंबई मंत्रालय प्रवास करून  चिकाटीने, जिद्दीने प्रश्न सोडवत आहेत आणि विकासाला सर्वाना बरोबर घेऊन एक नवा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.त्यांना पुढील कार्याला शुभेच्छा देत असतानाच माझीही काही मदत लागल्यास मी सदैव तुमच्या बरोबर आहे तरुणांनी त्यांचा आदर्श घ्यावा असे उद्गार आमदार दत्तात्रय सावंत यांनी खर्डी येथील कार्यक्रमात बोलताना काढले.

युवक नेते आणि खर्डीचे उपसरपंच प्रणव परिचारक यांच्या 30 व्या वाढदिवसानिमित्त नागरी सत्कारांचे आयोजन खर्डी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पुणे विभाग शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत सर बोलत  होते तर अध्यक्ष स्थानी ह.भ.प.जयवंत बोधले महाराज होते.
जिल्ह्याच्या राजकारणावर आपल्या सेवाकार्यांने ठसा उमटवणारे परिचारक कुटुंब,आणि परिचर्या म्हणजेच सेवा करणारे ते परिचारकअसे गौरवोद्गार ह.भ.प.जयवंत बोधले महाराज यांनी खर्डी येथील कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात बोलताना काढले .
यावेळी सत्काराला उत्तर देताना प्रणव परिचारक म्हणाले की माझे आजोबा  अण्णा,मोठे मालक,प्रशांत काका,उमेश काका त्यांची कार्यशैली आजही गावाला ठाऊक आहे त्याच गावकर्‍यांच्या प्रेमावर आजवर आम्ही तुमची सेवा करीत आहोत.भविष्यातही खूप काम करण्याची तयारी आहे गावातील क्राईम रेट आम्ही कमी केला आहे.आणि आणखी भुयारी गटारे आणि अनेक विकासाची कामे आम्ही करणार आहोत.फक्त तुम्ही साथ द्या.

कार्यक्रमाला आमदार दत्तात्रय सावंत,श्री जयवंत बोधले महाराज ,मुकुंदराव परिचारक ,सरपंच रमेश हाके,सुरेश आगावणे, पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातून आलेले तरुण नगरसेवक ,ग्रामपंचायत सदस्य ,कार्यकर्ते,पदाधिकारी,पंचायत समिती जि. प.चे पदाधिकारी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.संतोष मोरे आणि सुरेश आगावणे यांची मनोगते झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्ता हिल्लाळ यांनी केले तर सूत्रसंचालन मोहन रोंगे यांनी केले आभार महादेव भोसले यांनी मानले.
कार्यक्रमासाठी समाधान लोहार,बंडू रणदिवे,हणमंत पाटील,भाऊ मोरे,अमोल पाटील,उमा रोंगे, प्रकाश चंदनशिवे,समाधान  हिल्लाळ,संतोष कांबळे आदींनी परिश्रम घेतले.

यावेळी पंढरीतील प्रणव परिचारक युवा मंचचे शैलेश आगावणे, सौेरभ घाडगे, महेश झुंबल, सुर्यकांत इनामदार, विक्रम माने, आकाश आवताडे, तमीम सय्यद, मुन्ना सालविठ्ठल, विजय माने, निलेश मोहिते, नितीन केसकर, रवि गुरव, संतोष पाटील, विजय भुसनर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.    
(सर्व छाया अमेय कुलकर्णी)

=====================

14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *