👁 6 Views

अरे देवा! गर्लफ्रेंडला गुपचूप भेटायला आला बॉयफ्रेंड ; नातेवाईकांनी पकडलं अन् लग्नच लावलं

 

उत्तर प्रदेशच्या आझमगड जिल्ह्यात प्रेयसीला भेटायला आलेल्या प्रियकराला लोकांनी पकडलं अन् थेट लग्न लावून दिल्याची घटना आता समोर आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, 26 जानेवारी रोजी बच्चुआपार गावात राहणारा तरुण आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी अतरौलिया पोलीस स्टेशन हद्दीतील मैनुद्दीन पूर गावात पोहोचला होता. यावेळी ग्रामस्थांनी दोघांना रंगेहाथ पकडलं.

सुरुवातीला तरुण आणि तरुणीच्या कुटुंबासह ग्रामस्थ पोलीस ठाण्यात आले, मात्र नंतर दोन्ही पक्षांच्या संमतीने दोघांनी दुसऱ्या दिवशी समो मातेच्या मंदिरात विवाह केला.


 कप्तानगंज पोलीस स्टेशन हद्दीतील बच्चुआपार गावात राहणारा राहुल राजभर आणि अतरौलिया पोलीस स्टेशन हद्दीतील मैनुद्दीन पुर गावात राहणारी करिश्मा राजभर यांच्यात गेल्या काही दिवसांपासून प्रेमसंबंध सुरू होते.


मुलगा पुन्हा पुन्हा गावात तरुणीला भेटायला यायचा. 26 जानेवारीलाही प्रियकर प्रेयसीला भेटायला आला होता, तेव्हाच गावकऱ्यांनी दोघांना पकडलें गावकऱ्यांनी मुलाच्या कुटुंबीयांना त्यांच्या गावी बोलावले. दोन्ही पक्षांच्या संमतीने या दोघांचा समो माता मंदिरात विवाह झाला. मुलगा आणि मुलगी यांनी एकमेकांशी आनंदाने लग्न केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *