👁 5 Views

पंढरपूर शहरातील विविध विकास कामांची नुतन उपविभागीय अधिकारी संजय ढोले यांनी पाहणी केली

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

पंढरपूर Live 31 December 2017


   पंढरपूर
शहर हे भारताची दक्षिण काशी समजली जाते. शहरामध्ये भरणा-या चार मोठ्या यात्रा,
अधिक मास व दरमहिना होणारी एकादशी व दररोज येणारे भाविक यांची संख्या कोट्यावधी
असल्याने शासनाने पंढरपूर ,देहु, आळंदी, भंडाराडोंगर या तिर्थक्षेत्रासाठी विकास
आराखडा तयार करुन मोठया प्रमाणात निधी मंजुर 
केला. या निधी मधुन पंढरपूर शहरामध्ये विविध ठिकाणी विकास कामे प्रगती
पथावर आहेत सदर कामाची पहाणी नुतन उपविभागीय अधिकारी संजय ढोले यांनी उप
मुख्याधिकारी सुनिल वाळुजकर,नगर अभियंता दिनेश शास्त्री यांच्या समवेत केली .

    पंढरपूर शहराचे नुतन उपविभागीय अधिकारी म्हणुन
नुकतेच संजय ढोले यांनी पदभार स्विकारला असुन त्यांनी आपल्या कामाचा ठसा
उमटविण्यास सुरवात केली आहे. आज सकाळी १०.०० वाजले पासुन दुपारी ३.०० वाजे पर्यंत
उप विभागीय अधिकारी यांनी शहरातील पर्यटक निवास ते गोपाळपूररोड,गजानन महाराज रोड,
महात्मा फुले चौक ते गोपाळपूर विष्णूपद येथील चालु असलेल्या रस्त्याच्या पहाणी
केली तसेच विष्णूपदास भेट देऊन पत्रा शेड येथील दर्शन बारीचा मार्ग पायीचालत
बघितला तसेच शहरातील सर्व नव्याने बांधण्यात आलेल्या  सुलभ शौचालयाची पहाणी केली. तसेच भक्ती सागर
येथील ६५ एकर मध्ये बांधण्यात आलेल्या शौचालयाची व एम.टी.डी.सी च्या मार्फत
बांधण्यात आलेल्या भव्य अशा वारकरी निवासाची व त्या ठिकाणी बांधण्यात आलेल्या पार्कींग
व शौचालयाची पहाणी केली. तसेच या ठिकाणी भाविकांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेल्या
पाच लाख लिटर पाण्याची टाकी व जलशुद्धीकरण केंद्रास ही भेट दिली.नदी पात्रात
बांधण्यात येणार्‍या सर्व घाटांची पहाणी केली,जुना अकलुज नाका ते कर्मवीर भाऊराव
पाटील चौक या रस्त्याची पहाणीकरुन वाखरी तळ येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज व
जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या चौथार्‍याची पहाणी करुन या ठिकाणी
बांधण्यात आलेल्या ४४८ शौचालयाची पहाणी केली व यात्रा काळात  पाणी पुरवठा बाबतची माहिती घेतली या वेळी सदरची
कामे अतिशय चांगल्या प्रतिची होण्याच्या दृष्टीने व येणार्‍या भाविकांना जास्तीत
जास्त चांगल्या सुविधा  देण्याचा प्रयत्न करणार
असल्याचे सांगुन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनानुसार सार्वजनिक
बांधकाम विभाग,महाराष्ट्र जिवन प्राधिकरण,महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ,पंढरपूर
नगरपरिषद,शहर व तालुका पोलीस विभाग  यांचा
समन्वय साधुन  शहरातील सर्व विकास कामे
लवकरात लवकर पुर्ण होण्याच्या दृष्टीने व चांगल्या प्रतिची होण्याचा दृष्टीने
प्रयत्न करणार असलेचे सांगितले.तसेच संबंधीत ठेकेदार यांनी वेळेत काम पुर्ण
करण्याच्या दृष्टीने त्यांच्याकडून कामाचा बारचार्ट घेवुन वारंवार कामामध्ये
येणार्‍या अडचणी दुरकरुन कामाचा प्रगती अहवाल प्रत्येक आठवड्यामध्ये घेणार असलेचे
सांगितले तसेच याबाबत संबंधीत सर्व विभागांना चालू असलेल्या विकास कामाचा अहवाल
दररोजच्या दररोज देण्यबाबत सुचना देण्यात आलेली आहे.
 

=====================

14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *