👁 4 Views

केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत राबविण्यात येणार्‍या स्वच्छ सर्व्हेक्षण २०१८ यशस्वी करण्यासाठी शहरातील नागरिकांनी शहर स्वच्छ राहणे बाबत सहकार्य करावे- नगराध्यक्षा साधनाताई भोसले

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 


पंढरपूर Live 31 December 2017



केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियाना अतंर्गत ४ जानेवारी २०१८ पासुन स्वच्छ सर्व्हेक्षण २०१८ हे अभियान सुरु केले असुन संर्पुण महाराष्ट्र सह भारतभर हे अभियान राबविण्यात येत आहे. या स्वच्छ अभियान अंतर्गत
देशातील सर्व शहरे व ग्रामीण भाग हगणदारी मुक्त झाली त्या प्रमाणे शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेवुन शहरामध्ये होणारा कचरा याचा विचार करता घन कचरा व्यवस्थापन अंतर्गत शहरे स्वच्छ व सुंदर
व्हावीत या उदात्त हेतुने हे अभियान राबविण्यात येत आहे. 





संपुर्ण देशात कचर्‍याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. शहरामध्ये निर्माण होणारा कचरा व या कचर्‍याचे विलगीकरण करुन या कचर्‍यावर प्रक्रीयाकरुन खत निर्मीती करण्यात येणार आहे. त्यामुळे शहर स्वच्छ राहावे व नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे या हेतुने पंढरपूर शहरातील नागरिकांनी पंढरपूर शहर स्वच्छ व सुंदर होण्यासाठी शहरातील सर्व व्यापारी,व्यवसायीक,रहीवाशी,भाविक,मठ व मंगल कार्यालय व इतर
नागरिकांनी आपल्या घरामध्ये अथवा व्यवसायाच्या ठिकाणी ओला कचरा व सुका कचर्‍यासाठी दोन स्वतंत्र डबे ठेवावेत व नगरपरिषदेने कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी आपल्या दारा पर्यंत उपलब्धकरुन 
दिली आहे. त्या घंटागाडीतच आपला कचरा द्यावा व कोणत्याही परिस्थितीत आपला कचरा कचरा कुंडीत टाकु नये. भविष्यात शहर कचरा मुक्त व कचरा कुंड मुक्त शहर बनविण्याचा प्रयंत्न आपण करणार आहोत त्यामुळे आपले घर आपल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकांची आहे.तसेच शहर प्लॅस्टिक मुक्त होण्यासाठी सुद्धा नागरिकामध्ये जनजागृती व्हावी व प्लॅस्टिकचा वापर टाळावा म्हणुन नगरपरिषद व बँक ऑफ इंडीया यांच्या वतीने कापडी पिशव्याचे वाटप करण्यात येणार आहे त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी सर्व्हेक्षण २०१८ हे स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे अहवान नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले,उपनगराध्यक्षा सौ.सुजाता बडवे,मुख्याधिकारी अभिजीत
बापट,आरोग्य समितीचे सभापती सौ,भाग्यश्री देवेंद्र शिंदे यांनी केले आहे. 


याच उपक्रमाचा पहीला टप्पा म्हणुन नवीपेठ बाजार भाग, छ.शिवाजी महाराज चौक ते महाव्दार घाट,छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महात्मा जोतीबा फुले चौक येथे दररोज सायंकाळी गेल्या दोन
महिन्यापासुन रात्रपाळीमध्ये विशेष सफाई कर्मचार्‍यांच्या टिमद्वारे स्वच्छता करण्यात येत आहे यासाठी मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या मार्गदर्शना खाली,उप मुख्याधिकारी सुनिल वाळुजकर,आरोग्याधिकारी डॅा .संग्राम गायकवाड,आरोग्य निरिक्षक शरद वाघमारे,नागनाथ तोडकर,बर्मा पवार,मारुती मोरे,कुमार भोपळे,हे प्रयत्नशील आहेत.

=====================

14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *